Parineeti-Raghav Wedding First Photo
Parineeti-Raghav Wedding First Photo Saam Tv
मनोरंजन

Parineeti-Raghav Wedding First Photo: 'राघनीती'च्या लग्नाचा पहिला फोटो आला समोर, खूपच सुंदर दिसतायत परिणीती आणि राघव

Priya More

Parineeti-Raghav Wedding:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे नेते राघव चड्ढा (Raghav Chadha) अखेर विवाहबंधनात अडकले. परिणीती आणि राघवचा शाही विवाहसोहळा २४ सप्टेंबर म्हणजे रविवारी उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये पार पडला. दोघांचेही कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा संपन्न झाला. या लग्नसोहळ्याला राजकिय नेत्यांपासून ते बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. राघव आणि परिणीतीच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

राघव आणि परिणीती यांचा लग्नानंतरचा फोटो सध्या समोर आला आहे. लग्नानंतर रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यातील या कपलचा फोटो समोर आला आहे. पिंक कलरच्या साडीमध्ये परिणीती खूपच सुंदर दिसत आहे. परिणीतीने भांगामध्ये कुंकू भरल्याचे या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे. तर राघव ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट कलरच्या सूटमध्ये खूपच हँडसम दिसत आहे. दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याला दोघांच्याही चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे.

परिणीती आणि राघवचीच सगळीकडे चर्चा सुरु आहे. या कपलच्या लग्नाबाबत दोघांचेही चाहते खूपच उत्सुक होते. त्यांच्या लग्नातील फोटो समोर येण्याची चाहते वाट पाहत होते. अखेर त्यांच्या लग्नातील फोटो व्हायरल झाला. या फोटोंवर कमेंट्स करत चाहते या कपलवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. ऐवढंच नाही तर वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. यावर त्यांच्या जवळच्या मित्र-मैत्रिणी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील कमेंट्स करत दोघांनाही भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत.

परिणीती आणि राघवने विवाहबंधनात अडकल्यानंतर लीला पॅलेरमध्ये ग्रँड रिसेप्शन पार्टी दिली. या लग्नसोहळ्याचे एक-एक फोटो आणि व्हिडीओ आता समोर येऊ लागले आहेत. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने परिणीतीच्या लग्नासाठीचा ड्रेस डिझाइन केल्याची माहिती समोर आली होती. मनिष मल्होत्राने देखील या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली. त्याने हॉटेल लीला पॅलेसमधून त्याचा फोटो शेअर केला होता. परिणीता आणि राघवच्या लग्नाला आदित्य ठाकरे, सानिया मिर्झा, अरविंद केजरीवाल यांनी हजेरी लावली होती. लग्नासाठी जयपूरमध्ये दाखल झाल्याचे त्यांचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

24th Feb Dainik Panchang : माघ पौर्णिमा,२४ फेब्रुवारी, २०२४ आजची रास कोणती? वाचा एका क्लिकवर

Hingoli Accident News: देवदर्शनाला जाताना काळाचा घाला! भरधाव पिकअपने भाविकांना चिरडले; ४ जागीच ठार; ५ जखमी

Rajesh Tope यांनी अजित पवारांची घेतली भेट,नेमकं कारण काय?| Marathi News

Pune Metro: पुणे मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रिटर्न तिकीट सेवा 1 मार्चपासून होणार बंद

Maharashtra Breaking News: सगेसोयरे कायद्यासाठी आज राज्यातील प्रत्येक गावात रास्ता रोको आंदोलन

SCROLL FOR NEXT