Parineeti- Raghav Chadha Look Saam Tv
मनोरंजन बातम्या

Parineeti- Raghav Chadha Look: शेवटी ठरलं ! साखरपुड्यात परिणीती-राघव ‘या’ फेमस डिझायनरचे घालणार कपडे; असा असेल क्यूट कपलचा लूक

परिणीती आणि राघव दोघेही आपल्या आयुष्यातील खास क्षणी एका स्पेशल सेलेब्रिटी डिझायनरने डिझाईन केलेला लेहेंगा घालणार असल्याची माहिती मिळत आहे.

Chetan Bodke

Parineeti- Raghav Chadha Look: २०११ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या परिणीतीने सर्वांनाच आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली. पण यावेळी परिणीती आपल्या अभिनयामुळे नाही तर, एका खासगी गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. येत्या १३ मे ला ही जोडी साखपरपुडा करणार असल्याची माहिती मिळत आहे.

परिणीती आणि राघव दोघेही आपल्या आयुष्यातील खास क्षणी सेलेब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला लेहेंगा घालणार असल्याची माहिती मिळत आहे. आता साखरपुड्याच्या दोघांच्याही आउटफिटबद्दल काही बातम्या समोर आल्या आहेत.

राघव- परिणीती येत्या १३ मे ला दिल्लीत कॅनॉट प्लॅस स्थित कपूरथला हाऊसमध्ये पारंपारिक पद्धतीने साखरपुडा होणार आहे. सध्या ही जोडी साखरपुड्याच्या तयारीत व्यग्र आहेत. नुकतेच ही जोडी मुंबईसह दिल्ली विमानतळावर या जोडीला माध्यमकर्मींनी स्पॉट केलं होतं. या क्यूट कपलसाठी मनिष मल्होत्राने कलर- कॉर्डिनेट आऊटफिट्स डिझाईन केले आहेत. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, राघवने फॅशन डिझायनर पवन सचदेवाने डिझाईन केलेला कुर्ता घालणार आहे. हे क्यूट कपल आपल्या साखरपुड्याला भारतीय पोशाखच घालणार आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, परिणीतीच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या आयुष्यातील खास प्रसंगी मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला ड्रेस घालणार आहे. मंगळवारी दिल्लीला जाण्यापूर्वी परिणीती मनीष मल्होत्राच्या घराबाहेर स्पॉट झाली होती. तेव्हापासून आपल्या साखरपुड्यात परिणीती मनीषने डिझाइन केलेले कपडे घालणार असल्याची चर्चा रंगली. राघव चड्ढा त्यांच्या एंगेजमेंट सेरेमनीमध्ये खास डिझाईन केलेला कुर्ता परिधान करणार आहेत. सोबतच परिणीतीसाठी देखील खास डिझाईन केलेले चार ड्रेस बनवण्यात आले आहेत. सध्या तिच्या फॅशनचीही कमालीची चर्चा होत आहे.

गेल्या काही दिवसांपुर्वी, परिणीती आणि राघव सलग दोन दिवस मुंबईत लंच आणि डिनर डेटला जाताना एकत्र स्पॉट झाले होते. तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगायला सुरूवात झाली होती. यानंतर अलीकडेच, परिणीती आणि राघव दोघांनीही आयपीलचा सामना पाहण्यासाठी क्रिकेट स्टेडियम गाठलं होतं, त्यावेळी सुद्धा त्यांच्या अफेयरची चर्चा रंगली होती. मे महिन्यात साखरपुडा आटोपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात राघव- परिणीती लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

SCROLL FOR NEXT