Neena Gupta France Vacation Saam Tv
मनोरंजन बातम्या

Neena Gupta France Vacation: नीना गुप्ताची फ्रान्स ट्रिप ठरलीये खास, पतीसोबत मौजमजा; 64 वर्षीय अभिनेत्रीची लाइफस्टाइल बघून नेटकरी भारावले

Neena Gupta And Vivek Mehara Viral Video: ६४ वर्षीय नीना यांच्या परदेशवारीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Chetan Bodke

Neena Gupta Vacation In France: बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता सध्या ‘लस्ट स्टोरी २’ या वेबसीरिजमधील बोल्ड आजीच्या भूमिकेमुळे त्या चर्चेत आल्या आहेत. सध्या नीना यांच्या हटक्या भूमिकेची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. त्यांच्या या हटक्या भूमिकेला सोशल मीडियावर अनेक युजर्सने ट्रोल केले आहे तर, काहींनी नीना गुप्तांचे कौतुक केले. आपल्या बोल्ड वक्तव्यांनी चर्चेत राहिलेल्या नीना गुप्ता (Neena Gupta) सध्या परदेश वारी करत आहेत. ६४ वर्षीय नीना यांच्या परदेशवारीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सध्या नीना गुप्ता पती विवेक मेहरासोबत फ्रान्समध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे. नीना यांनी सोशल मीडियावर सुट्टीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या सिनेकारकिर्दिच्या सेकेंड इनिंगची बरीच चर्चा होत आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडिओत त्यांनी काही बॉलिवूड गाण्यांवर जबरदस्त ठुमका लावले आहेत. व्हायरल व्हिडिओत अभिनेत्रीसोबत तिचा पती देखील खूप एन्जॉय करताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी दोघांच्याही फॅशनचे कौतुक केले आहे.

हा व्हिडिओ शेअर करतांना नीना गुप्ता यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘Mauja hi mauja in Mougins, France!’सध्या त्यांच्या धमाल मस्ती करतानाच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव करत कमेंट केल्या आहेत. काहींनी नीना यांना त्यांच्या वयावरुन ट्रोल केले आहे. तर काहींनी नीना आणि विवेक मेहराच्या लाईफस्टाईलचे कौतुक केले आहे.

नीना यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ‘लस्ट स्टोरी २’मध्ये नीना गुप्ता प्रमुख भूमिकेत दिसल्या आहेत. हा चित्रपट २९ जून रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. याशिवाय नीना गुप्ता ‘इश्क नादान’ मध्ये आणि ‘पंचायत’ या हिट वेब सीरिजच्या नव्या सीझनमध्येही दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

Maharashtra News Live Update: परभणीत मध्यरात्री धक्कादायक घटना; आलिशान कारमधून येत मोकाट गायीची चोरी

Hair Care: पावसाळ्यात फ्रिझी केसांपासून मिळवा सुटका; फॉलो करा या ५ सोप्या हेअर केअर टिप्स

हातात बेड्या अन् प्रचंड राग...पंतप्रधानांच्या घराबाहेर राहुल गांधींनी केलेल्या आंदोलनाची दृश्ये, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT