Famous Actress SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actress : स्टेज ४ कॅन्सरशी झुंज सुरू, किमोथेरपीने होतोय भयंकर त्रास; तरीही प्रसिद्ध अभिनेत्री करतेय चित्रपटाचे शूटिंग

Bollywood Actress Battling With Cancer : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कॅन्सरशी लढा देत आहे. किमोथेरपी घेऊन तिने चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री देतेय कॅन्सरशी लढा

किमोथेरपी घेत करतेय काम

आजारपणातही चित्रपटाचे शूटिंग केले

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री गेल्याकाही वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत आहे. अशात आता ज्येष्ठ अभिनेत्री नफीसा अली यांचा 'मॅक्स, मिन अँड म्यौझाकी' (Max, Min and Meowzaki) हा आगामी चित्रपट येत आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये अनेक पुरस्कार जिंकल्यानंतर, हा 'कॉमेडी-ड्रामा' २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. वयाच्या 69 वर्षी अभिनेत्री नफिसा अली कॅन्सरशी लढा देत काम करत आहेत.

नफिसा अली यांचा कर्करोगाशी लढा

२०१८ मध्ये नफिसा अली यांना 'पेरिटोनियल' आणि 'ओव्हेरियन' (अंडाशयाचा) कर्करोग (स्टेज ३ कॅन्सर) असल्याचे निदान झाले होते आणि त्यातून त्या बऱ्याही झाल्या होत्या. मात्र, गेल्या वर्षी हा गंभीर आजार पुन्हा बळावला. त्यांना स्टेज ४ कॅन्सर असल्याचे समजले. freepressjournal शी बोलताना सांगितले की, "खरं तर, मी पॅडीला (दिग्दर्शक पद्मकुमार नरसिंहमूर्ती) सांगितलं होतं की, मी सध्या कॅन्सर आणि केमोथेरपीच्या प्रक्रियेतून जात आहे, माझा लूक बदलला आहे आणि मला अभिनय करायचा नाहीये. पण पॅडीने मला ठामपणे नकार दिला आणि पुन्हा कॅमेरासमोर उभे राहण्याचे धैर्य दिले; माझ्या शरीराला ज्या वेदनादायी स्थितीतून जावे लागत होते, त्याकडे दुर्लक्ष करून त्याने मला प्रोत्साहित केले. त्याबद्दल मी त्याची ऋणी आहे. मी अजूनही या आजाराशी लढा देत आहे."

नफिसा अली यांचे आभार मानताना निर्माती समीक्षा ओसवाल भावूक होऊन म्हणाल्या, "मी फक्त एवढेच म्हणेन की मी नफिसा जी खूप आभारी आहे. आम्ही चित्रपटाचे काम सुरू करण्यापूर्वीच त्यांची पहिली शस्त्रक्रिया झाली होती. त्या कॅन्सरशी लढा देत आहेत आणि कालच त्या माझ्यासोबत विमानाने प्रवास करून आल्या. त्यांनी बोन मॅरोचे इंजेक्शन घेतले होते आणि काही दिवसांपूर्वीच त्यांची केमोथेरपी झाली होती."

चित्रपटाची रिलीज डेट

पद्मकुमार नरसिंहमूर्ती यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या 'मॅक्स, मिन अँड म्यौझाकी' या चित्रपटात सिद्धार्थ मेनन, मेधा शंकर, आदिल हुसेन, नसीर, नफिसा अली, मंदिरा बेदी आणि विधात्री बांडी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 'मॅक्स' आणि 'मिन' या तरुण जोडप्याभोवती फिरतो, ज्यांना त्यांच्या ब्रेकअपनंतरच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. हा चित्रपट २४ जुलै २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.तसेच त्या 'यमला पगला दीवाना', 'लाइफ इन अ मेट्रो', 'बेवफा' आणि 'मेजर साब' यांसारख्या चित्रपटांमध्येही झळकल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIRAL VIDEO : बाबोSSS...दुबईतील शाळांची फी किती? विद्यार्थीनीच्या आईने सांगितला अविश्वसनीय आकडा, बघून डोळे पडतील पांढरेफट्ट

Sukanya Samruddhi Yojna : Sukanya Samruddhi Yojna: मुलींच्या भविष्यासाठी आताच निर्णय घ्या, सुकन्या समृद्धी योजनेत अशी करा गुंतवणूक?

Railway Accident : हायकोर्टाचा मोठा निर्णय! रेल्वेत चढताना पडून मृत्यू झाला तरी भरपाई मिळणार

Maharashtra News Live Update: अंगणवाडीतील चिमुकल्यांना आणि गरोदर मातांना निकृष्ट आहार

Rahul Gandhi: राहुल गांधी पुन्हा आक्रमक, दिल्लीतील पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT