Mallika Sherawat SAAM TV
मनोरंजन बातम्या

Mallika Sherawat :मल्लिका शेरावतचा ब्रेकअप; स्वतः केला खुलासा, परदेशी बॉयफ्रेंड नक्की कोण?

Mallika Sherawat Breakup : बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने आपल्या ब्रेकअपचा खुलासा केला आहे. आपल्या ब्रेकअपचे नेमकं कारण तिने सांगितले आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) आपल्या खास अंदाजासाठी ओळखली जाते. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने खूप वेळापासून सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला होता. मात्र आता तिने पुन्हा मनोरंजन सृष्टीत आगमन केले आहे. इमरान हाश्मीसोबतचे तिचे काम कायमच चर्चेत राहीले आहे. मल्लिका शेरावत कायमच तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत राहिली आहे.

मल्लिका या पूर्वी अनेक वर्ष परदेशात राहिली आहे. तिथे ती एका मुलाला डेट करत होती. नुकताच एका मिडिया मुलाखतीत तिने आपला ब्रेकअप झाल्याचे सांगितले आहे. ती म्हणाली की, "हो माझा ब्रेकअप झालं आहे. खूप काळापासून मी सिरिल ऑक्सेनफेंसला डेट करत होते. मात्र आता आमचा ब्रेकअप झाला आहे. आम्ही वेगळे झालो आहोत. आताच्या काळात चांगला जोडीदार शोधणे खूपच कठीण आहे. मला याबद्दल जास्त काही बोलायचे नाही. पण आता मी सिंगल आहे."

लग्नसंस्थेवर विचारल्यावर मल्लिका म्हणाली, "मी लग्नसंस्थेचा विचारच करत नाही. हा फक्त त्या दोन लोकांचा निर्णय आहे. त्यामुळे तो फक्त त्यांनीच घ्यावा."

मल्लिका शेरावतचा बॉयफ्रेंड

मीडिया रिपोर्टनुसार, सिरिल ऑक्सेनफेन्स हा मल्लिका शेरावतचा बॉयफ्रेंड होता. हा फ्रान्सचा नागरिक असून बिझनेस मॅन आहे. रिअल इस्टेटमध्ये त्यांची मोठी गुंतवणूक आहे. मल्लिका आणि तो पॅरिसमध्ये राहायचा.

अलिकडेच मल्लिका 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' या चित्रपटात पाहायला मिळाली. मल्लिका सोशल मीडियावर सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे 2.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी! बंद झालेला ₹1500 चा हप्ता पुन्हा सुरू होणार, आदिती तटकरेंनी दिली अपडेट

Maharashtra News Live Update:एसआयआर मोहिमेदरम्यान महिला बीएलओला धक्काबुक्की, मायलेकीवर गुन्हा दाखल

Marathi Actress : 'वीण दोघांतली ही तुटेना' फेम अभिनेत्रीने खरेदी केली लग्जरी कार, नव्याकोऱ्या गाडीसोबत शेअर केला PHOTO

Crime News: स्मार्ट सिटी दाखवतो म्हणत सोबत नेलं, खोलीत कोंडून ठेवत ४ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार नंतर...

अमरावतीत भरदिवसा थरार! तरुणाची निर्घृण हत्या, हाताचा पंजाच छाटल्याने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT