Malaika Arora: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. कधी बोल्डनेस तडक्याने तर कधी आपल्या विशिष्ट शैलीतील फोटोंनी. सध्या तिचा 'मुविंग इन विथ मलायका' हा शो बराच नेटकऱ्यांच्या चर्चेत आहे. त्यातील काही व्हिडीओही ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या आयुष्यातील काही खास किस्स्यांचा उलगडा ती या कार्यक्रमात करत असते. सध्या तिचा आणि बॉलिवूड अभिनेता करण जोहरचाही व्हिडीओ बराच व्हायरल होत होता.
मलायकाच्या (Malaika Arora) आयुष्यातील अनोळखी बाजू दाखवणाऱ्या या शोमध्ये तिचा मुलगा अरहानचीही (Arhaan Khan) जगाला ओळख करून दिली. नुकताच तिच्या शोमध्ये तिचा मुलाने हजेरी लावली होती, यावेळी त्यानेही मागे न सरता आपल्या आईची मिश्किल भाषेत खिल्ली उडवली. आता अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या मुलासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. पण नेटकऱ्यांना ते फारसं पटलेलं नसून तिला ट्रोल (Social Media) केले आहे. मलायकाने नुकतेच तिच्या लेकासोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. (Trolled)
मलायका नेहमीच तिच्या खास अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने मुलगा अराहसोबत (Arhaan Khan) या शो दरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत मलायका, तिचा मुलगा अराह खान आणि तिच्या परिवारातील काही सदस्य या फोटोत दिसत आहे. (Moving In With Malaika)
शेअर करताना तिने एक कॅप्शन देत हा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, 'वॉर्म हग, वेड्यासारखे फोटो, आवडते खाणं, सुट्टीचे दिवस चांगले गेले' अशा आशयाचा संदेश देत तिने फोटो शेअर केली आहे.
तिच्या या फोटोवर काहींनी कौतूक केले आहेत तर काहींनी नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. नेटिझन्स मलायकाच्या फोटोंवर बराच लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडत आहे. नेटिझन्स मलायकाची कधी म्हातारी तर कधी आणखी काही म्हणत तिची खिल्ली उडवत आहेत. यासोबतच युजर्स मलायका आणि अर्जुन कपूरच्या नात्यावरही कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'तुला लाज वाटली पाहिजे, तुझा मुलगा मोठा झाला आहे, अर्जुन कपूरची साथ सोड, म्हातारे.'
अलीकडेच तिचा मुलगा अरहान मलायकासोबत 'मुव्हिंग इन विथ मलायका' (Moving In With Malaika) मध्ये दिसला होता. दोघांचेही नाते चाहत्यांना फारच भावले. पण सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे तिचा मुलगा अरहान त्याच्या आईच्या कपड्यांची खिल्ली उडवत होता.
यावेळी ती एका खास अंदाजात कार्यक्रमाला पोहोचली होती. आईचा ड्रेस पाहताच अरहानने त्याची तुलना टेबल नॅपकिनशी केली आहे. अरहान म्हणतो, तू सध्या तुरुंगातील कैद्यासारखी दिसत आहेस. मलायकाने ही आपल्या मुलाच्या या कमेंटवर खास प्रतिक्रिया न देत फक्त हशाची भूमिका साकारली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.