Madhuri Dixit SAAM TV
मनोरंजन बातम्या

Madhuri Dixit : धक धक गर्लनं भाड्याने दिले ऑफिस, किंमत ऐकून व्हाल थक्क

Madhuri Dixit Rents Property : बॉलिवूडची धक धक गर्ल नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री माधुरी दीक्षितने अंधेरीतील कार्यालय भाड्याने दिले आहे. भाड्याची किंमत जाणून घ्या.

Shreya Maskar

बॉलिवूडची धक-धक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit ) नेहमीच तिच्या अभिनय आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. तिने आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनय शैलीमुळे तिने लाखो चाहत्यांच्या मनात घर केले आहे. सध्या माधुरी दीक्षित एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. तिने आपले कार्यालय भाड्याने दिलं आहे.

अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपले अंधेरीतील कार्यालय खासगी कंपनीला भाड्याने दिले आहे. हे कार्यालय अंधेरी पश्चिमेला आहे. या कार्यालयचे तिला दरमहिना तीन लाख रुपये भाडे मिळणार आहे. तिचे कार्यालय १५९४.२४ चौरस फुटांचे आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा सर्व व्यवहार १३ नोव्हेंबरला झाला आहे. या व्यवहारात संबंधित कंपनीने नऊ लाख रुपयांचे डिपॉझिट दिले आहे.

माधुरी दीक्षित पहिल्या वर्षी तीन लाख रुपये भाडे घेणार असून 12 महिन्यांनंतर ३ लाख १५ हजार रुपये एवढे भाडे घेतले जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, माधुरी दीक्षितने अंधेरीतील कार्यालय 'करमतारा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड'ला दोन वर्षांसाठी भाड्याने दिले आहे. या वर्षी नोव्हेंबरला अभिनेता शाहिद कपूर याने देखील वरळी येथील आलिशान फ्लॅट २० लाख रुपयांच्या भाड्याने दिला आहे.

नुकतीच माधुरी दीक्षित कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटातील 'आमी जे तोमार' हे गाणे खूप हिट झाले आहे. चाहते माधुरी दीक्षित यांच्या आगामी प्रोजेक्टसाठी खूप उत्सुक असतात. माधुरी दीक्षितचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. त्यांचे इंस्टाग्रामवर 39.8 मिलियन फॉलोवर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नांदेड हादरलं! कुटुंबातील चौघांचा मृत्यू; २ तरुण्याबांड पोरांची रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या, घरी आई-बापानं जीवन संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Bangladesh: बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, बेदम मारहाण करून जीव घेतला

Pune Corporation Election: जागा वाटपावरून महायुतीचं बिनसलं, शिवसेना युतीमधून बाहेर पडणार? शिंदे गटाचा अल्टिमेटम

शिंदेंच्या यशानं, पवारांना टेन्शन! सेना - राष्ट्रवादीत ईर्ष्येची लढाई, अस्वस्थ दादा का भडकले मंत्र्यांवर?

मशालीला कॉग्रेसचा हात? ठाकरेसेनेला कॉंग्रेसचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT