Madhuri Dixit Nene Mother Saam Tv
मनोरंजन बातम्या

Snehlata Dixit: माधुरी दीक्षितचं मातृछत्र हरपलं, वयाच्या ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अभिनेत्री माधुरी दीक्षित नेनेच्या आई श्रीमती स्नेहलता दीक्षित यांचे आज सकाळी निधन झाले आहे.

Chetan Bodke

Madhuri Dixit Nene Passes Away: अभिनेत्री माधुरी दीक्षित नेनेच्या आई श्रीमती स्नेहलता दीक्षित यांचे आज सकाळी ८.४० वाजता निधन झाले आहे. त्यांनी मुंबईतील राहत्या घरी वयाच्या ९० व्या वर्षी अखेरचा एका हिंदी संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्या पार्थिवावर दुपारी ३.४० च्या दरम्यान वरळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

27 जून 2022 रोजी, माधुरी दीक्षितने सोशल मीडियावर तिची प्रिय आई स्नेहलता दीक्षित यांचे फोटो पोस्ट केले होते. पहिल्या फोटोत माधुरी तिची आई आणि तिचा पती श्रीराम नेने यांच्यासोबतचा फोटो होता. माधुरीची आई ९० वर्षांची असून, माधुरीने तिच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

माधुरीने त्या पोस्टला कॅप्शन दिले होते की, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा, ते म्हणतात की आई ही मुलीची सर्वात चांगली मैत्रीण असते. ते अधिक योग्य असू शकत नाहीत. तू माझ्यासाठी केलेले सर्व काही, तू मला शिकवलेले धडे ही तुझ्याकडून माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे. मी तुम्हाला फक्त चांगले आरोग्य आणि आनंदाची शुभेच्छा देतो!'

तर सोबतच डॉ. नेने यांनीही त्यांच्या सासूसाठी खास पोस्ट शेअर केली होती. माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी काही दिवसांपुर्वी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला होता. या चित्रात डॉ.नेने यांनी दोन चहाच्या कपांचे फोटो शेअर केले होते. श्रीराम नेने यांच्या या फोटोत दिसणार्‍या दोन कपवर भव्य पेंटिंगची झलक स्पष्टपणे दिसत होती.

नेने यांनी त्या पोस्टला कॅप्शन दिले की, 'माझी 90 वर्षांची सासू अप्रतिम पेंट करते. त्यांचे शरीर फारसं काम करत नसून तिला फारसं स्पष्ट दिसत नाही. पण तिच्या मनात जे येते ते खरोखरच अद्भुत आहे. ती जगातील सर्वात आश्चर्यकारक आणि सकारात्मक व्यक्ती आहे. त्यांच्या प्रतिभेची आठवण करून देण्यासाठी आम्ही त्यांच्या मग पेंटिंगची एक झलक सादर केली आहे.

माधुरीच्या आई स्नेहलता दीक्षित यांच्या कामाबद्दल बोलायचे, तर त्या भेंडीबझार घराण्याच्या गायिका होत्या. ‘गुलाब गँग’ या सिनेमातल्या गाण्यासाठी मायलेकींनी प्रथमच एका गाण्याला आवाज दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, महिला नेत्या करणार अजित पवार गटात प्रवेश

Diet Mistakes : रोज सकाळी उपाशी पोटी चिया सीड्स खाणं आत्ताच टाळा, अन्यथा होईल मोठं नुकसान

Rain Alert : विदर्भात पुढील आठवडाभर पावसाचा इशारा; पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Live News Update: नाशिक महापालिका हद्दीतील कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश

Ladki Bahin Yojana: दरमहा मिळतात १५०० रुपये, सरकारच्या योजनेवरच लाडक्या बहिणी रुसल्या | VIDEO

SCROLL FOR NEXT