Madhuri Dixit SAAM TV
मनोरंजन बातम्या

Madhuri Dixit : "पावसाची जादू...", माधुरी दीक्षित पावसात चिंब भिजली, पाहा VIDEO

Madhuri Dixit Video : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित पावसाचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे. याचा खास व्हिडीओ तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यंदा मे महिन्यातच पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वत्र हिरवळ आणि थंड वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक जण फिरण्याचा प्लान करत आहेत. पावसाचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे. पावसाळा म्हटलं की फिरणे आणि चटपटीत पदार्थांचा आस्वाद घेणे आलेच. पावसाळ्यात सर्वसामान्य लोकांसोबतच कलाकारमंडळी देखील नाचू-गाऊ लागतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बॉलिवूडची 'धकधक गर्ल' कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकताच तिने एक सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये माधुरी दीक्षित (Madhuri Dixit ) पावसाचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे. ती पावसात छत्री घेऊन नाचताना दिसत आहे. या व्हिडीओला तिने खूपच खास कॅप्शनं दिलं आहे. तिने लिहिलं आहे की, "मॅजिक ऑफ द सीझन..." तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

माधुरी दीक्षित पावसात एका सुंदर निसर्गरम्य ठिकाणी 'ये मौसम का जादू है मितवा...' या गाण्यावर मनसोक्त डान्स करत आहे. हे गाणे माधुरी दीक्षितच्या 'हम आपके है कौन' या चित्रपटातील आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि सलमान खान एकत्र पाहायला मिळाले. व्हिडीओमध्ये माधुरी दीक्षितने मरुन कलरचा ड्रेस परिधान केला आहे. हातात छत्री आणि मोकळे केसांमध्ये माधुरीचं सौंदर्य खुलून आले आहे. माधुरी दीक्षित पावसाचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे.

अलिकडेच माधुरी दीक्षित 'भूल भुलैया 3 ' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. चाहते आता माधुरी दीक्षितच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहे. माधुरी दीक्षितचा मोठा चाहता वर्ग आहे. ज्यात तसेच ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. आपल्या वेगवेगळ्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : संकष्टी चतुर्थीला बाप्पा ५ राशींच्या लोकांची इच्छा पूर्ण करणार; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Nepal Crisis : माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू, आंदोलकांनी पेटवलं होतं घर

Nepali celebrities: मनीषा कोइरालापासून सुनील थापापर्यंत, या नेपाळी सेलिब्रिटींनी मनोरंजन विश्वातून जिंकली चाहत्यांची मनं

Fever: वारंवार ताप येणे 'हे' कोणत्या आजारांचे लक्षण आहे?

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; पोलिसांकडून मोठी कारवाई, ढोल ताशा पथकातील दोघांना अटक

SCROLL FOR NEXT