Kiara Advani Canva
मनोरंजन बातम्या

Kiara Advani: विम्बल्डनचा सामना पाहायला गेलेली कियारा अडवाणी होतेय ट्रोल, काय आहे कारण?

Kiara Advani on Social Media: कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे सध्या लंडनमध्ये आहेत. ​​लंडनमध्ये विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात या कपलने उपस्थिती लावली आहे. या सामन्याचा आनंद घेत असलेल्या बॉलिवूडच्या फेव्हरेट कपलची अनेक छायाचित्रे समोर आली आहेत. मात्र, एकीकडे हे फोटो व्हारल होत असतानाच कियाराला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

Rutuja Kadam

बॉलीवूडच्या सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी! या कपलने अलीकडेच विम्बल्डन 2024 पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या जोडप्याने सर्वात मोठ्या टेनिस स्पर्धेचा आनंद लुटला आहे. त्यांचे सामना पाहतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, स्टार स्पोर्ट्स इंडियाच्या अधिकृत हँडलने या कपलच्या उपस्थितीची छायाचित्रे आणि व्हिडिओ जारी केले होते. पण आता सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. अनेकांनी त्यांच्या लूकची स्तुती केली आहे. कोरियन ड्रामामधील एखाद्या जोडप्याप्रमाणे कियारा आणि सिद्धार्थ हे कपल गोल्स असल्याचं मत अनेक नेटकऱ्यांनी व्यक्त केलं.

एकीकडे त्यांच्या लूकची आणि कपलची स्तुती होत असताना दुसरीकडे, नेटकऱ्यांनी कियारा ट्रोलसुद्धा केले आहे. स्टार स्पोर्टस इंडियाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर कियारा आणि सिद्धार्थची मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये त्यांना सामन्यासंदर्भात अनेक प्रश्न विचारले गेले. मात्र, यामध्ये ती सतत सिद्धार्थकडे पाहताना दिसते आहे. शिवाय तिच्या एका उत्तरामुळे नेटकऱ्यांनी थेट ट्रोल केले आहे.

नेमक्या कोणात्या कारणामुळे तू विम्बल्डन पाहण्यास आली आहेस? असा प्रश्न कियाराला विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना कियारा म्हणाली, '' इथं येणे खूप प्रतिष्ठेचे आहे. माझ्या पतीने मला सांगितले की, आम्ही इथं खेळ पाहण्यासाठी येत आहोत. तो म्हणाला की हे करावे लागेल कारण हा आयुष्यातील सुखद आणि कायम स्मरणात राहण्यासारखा अनुभव आहे. खेळ पाहण्यात मी नवीन आहे. आणि त्याचा मी सध्या आनंद घेत आहे.'' दरम्यान, यावरुनच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. ''तुला टेनिसमधील काही माहिती आहे का? , सिद्धार्थ ज्या खेळाडूंविषयी बोलतो आहे त्याविषयी तिला काहीच कळत नाही आहे, असं वाटतंय'' या आणि अशा कमेंट करत तिला ट्रोल करण्यात आले आहे.

दरम्यान, काही दिवसांपू्र्वीसुद्धा कियारा ट्रोल झाली होती. कियाराने तिच्या रेड कार्पेटवरील वॉकनंतर मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी तिची इंग्रजी ऐकून नेटकरी चांगलेच संतापले. तिच्या इंग्रजी बोलण्याच्या पद्धतीमुळे तिला बरंच ट्रोल करण्यात आलं होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT