Kangana Ranaut Saam tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: 'पठान'ला खडेबोल सुनावणाऱ्या कंगनाला नेटकऱ्याने झापलं, 'कंगना तुझ्या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी...'

बॉलिवूडची ड्रामा क्विन कंगना रणौत तब्बल दीड वर्षांनंतर ट्वीटरवर दमदार कमबॅक केले आहे.

Chetan Bodke

Kangana Ranaut: बॉलिवूडची ड्रामा क्विन कंगना रणौत सध्या बरीच चर्चेत आली आहे. तब्बल दीड वर्ष कंगना ट्वीटरपासून लांब होती. गेल्या काही दिवसांपुर्वीच कंगनाने ट्वीटरवर दमदार कमबॅक केले आहे. ट्वीटरवर परतताच तिने आपले परखड मत मांडायला सुरुवात केली आहे. शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या ‘पठान’ चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल भाष्य केलं. आताही ती ‘पठान’चित्रपटावरुन वेगवेगळे ट्वीट केले. यावरुनच कंगनाला एका ट्रोलरने चांगलेच सुनावले.

एक नेटकरी कंगनाला ट्विट करत म्हणतो, “कंगना तुझ्या ‘धाकड’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी फक्त ५५ लाख रुपये कमाई केली होती. शिवाय या चित्रपटाचं संपूर्ण बॉक्स ऑफिस कलेक्शन फक्त २ कोटी ५८ लाख रुपये होतं. पण ‘पठान’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. यामुळे नक्कीच कंगनाची चिडचीड झाली असणार.”

त्यावर कंगणानेही आपले रोखठोक मत मांडत त्याला प्रत्युत्तर केले. ती म्हणते, “हो, ‘धाकड’ हा एक मोठा ऐतिहासिक फ्लॉप चित्रपट होता. ही गोष्ट मी कधीच टाळणार नाही. शाहरुख खानचा गेल्या दहा वर्षांमध्ये हा पहिलाच चित्रपट चालला आहे. मीही त्याच्याकडून प्रेरणा घेते. भारताने जशी संधी त्याला दिली तशी आम्हालाही मिळेल अशी मी आशा करते. कारण भारत देश महान आहे. जय श्रीराम”.

काही दिवसांपूर्वीच कंगनाने तिच्या आगामी चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्याबद्दल एक पार्टी ठेवली होती. त्या पार्टीदरम्यान तिने ‘पठान’बाबत भाष्य केलं होतं. शाहरुखच्या चित्रपटाचं दरम्यान तोंड भरून कौतुकही केलं. शिवाय हिंदी चित्रपटांना पुढे आणण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असल्याचंही कंगनाने म्हटलं होतं. आता शाहरुखच्या या चित्रपटाने जगभरात ३०० कोटींपेक्षा अधिकचा टप्पा पार केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mouth Ulcer Symptoms: तोंड येण्यापुर्वी कोणती लक्षणे दिसतात?

'तु कोण आहेस रे? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर प्रहार, दिलं निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आव्हान

Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

Sachin Ghaiwal: 'मंत्रिमंडळ की गुंडांची टोळी'; सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन राऊतांचा प्रहार

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

SCROLL FOR NEXT