Kanagana Ranaut Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: कंगना पुन्हा ट्रोल; ट्रान्सपरंट ड्रेसमधील फोटो शेअर करत नेटकऱ्यांना म्हणाली, 'ऑफिसला जाऊ का?'

महिलांच्या कपड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना कंगनाने सडेतोड उत्तर दिले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बिनधास्त आणि बोल्ड, रोखठोक मते यामुळं कायम वादाच्या केंद्रस्थानी असलेली कंगना रनौत (Kangana Ranut) पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. यावेळी विषय जरा हटके आहे, पण तिला यामुळं ट्रोलधाडीला सामोरं जावं लागलंय एवढं मात्र नक्की! महिलांनी कोणते कपडे घालावेत, कोणते कपडे घालू नयेत, हा त्यांच्या त्यांच्या निवडीचा प्रश्न आहे, असं ती बिनधास्तपणे बोलली. (Bollywood) पण कंगना काहीही बोलली तरी तिला ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं, हे या मुद्द्यावरून दिसून आलं. (Bollywood Actress)

कंगना रनौत नेहमीच सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड चर्चेत असते. गेल्या आठवड्यातच ती सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलेली दिसली. कंगना साधी साडी परिधान केली होती. लाखोंची हॅंड बॅग हातात होती आणि विमानतळावर पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली होती.

नुकतेच कंगनाने काही फोटो शेअर केले आहेत. त्यात एका खास आऊटफिटमध्ये ती दिसून आली आहे. तिच्या इन्स्टा स्टोरीवर दोन फोटो शेअर करत तिने तिच्या कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. "फक्त या गोष्टीवर जास्त लक्ष देत आहे, महिला काय घालतात किंवा त्यांनी काय घालायचे ही त्यांची निवड आहे," असे कंगनाने म्हटले आहे.

या कॅप्शनमध्ये कंगनाने हसणारा इमोजीही टाकत आणखी एक फोटो शेअर करत टोमणा मारला आहे. “मला वाटतं मी माझं म्हणणं मांडलंय… मी आता ऑफिसला जाऊ का? बाय," असंही कॅप्शनमध्ये तिनं म्हटलं आहे. या फोटोमध्ये कंगना ब्रॅलेट आणि पांढर्‍या पँटमध्ये दिसत आहे.

नेटकऱ्यांनी कंगनाला केले ट्रोल

कंगनाच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांसह नेटकरीही कमेंट करत आहेत. 'असे कपडे जर दुसरे कोणी घातले असते, तर दीदींना धर्म, संस्कृती आणि बरेच काही आठवले असते,' अशी टीका एका यूजरने केली आहे. 'ही तीच आहे, जिने उर्मिला मातोंडकरला तिच्या कपड्यांवरून Adult Star म्हटले होते,' अशी आठवण अन्य एका यूजरने करून दिली. "ही तीच आहे, जी रिहानाला आपल्या संस्कृतीचे धडे देत होती," अशा शब्दांत अन्य एका यूजरने तिला सुनावले.

सध्या कंगना आगामी चित्रपट 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. नेहमीच ती सोशल मीडियावर चित्रपटासंबंधी माहिती शेअर करत असते. चित्रपटाची शूटिंग पुढे शेड्युल्ड करण्यासाठी चित्रपटाची टीम काम करत आहे. त्या टीमसोबत कंगनाही बसलेली दिसत आहे. मणिकर्णिका फिल्म्स निर्मित हा सिनेमा असून, कंगना स्वतः चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonalee Kulkarni: 'परमसुंदरी' अप्सरा सोनाली कुलकर्णीचा नवा लूक, पाहून मन होईल घायाळ

Maharashtra Live News Update: Parbhani: बस आणि पिकअपचा भीषण अपघात, बस झाली पलटी, सुदैवाने जीवितहानी नाही

karishma kapoor Children: करिश्मा कपूरच्या घरातील वाद चव्हाट्यावर; ३००० कोटींच्या वादात संजय कपूरच्या बहीणीची एन्ट्री

Torna Fort History: ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध, भव्य वास्तुकला आणि नैसर्गिक आकर्षण, तोरणा किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Tharala Tar Mag : सायलीच्या आयुष्यात पुन्हा येणार 'प्रिया' नावाचे वादळ, मालिकेत पुढे काय घडणार? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT