Kangana Ranaut SAAM TV
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut : कंगना रणौतनं सुरू केला कॅफे, पहिला ग्राहक कोण असणार?

Kangana Ranaut New Cafe First Client : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत यांनी मनालीमध्ये सुंदर कॅफे उघडला आहे. या कॅफेची पहिली ग्राहक कोण असणार, जाणून घ्या.

Shreya Maskar

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्या एक स्पष्ट वक्ता आहेत. कायमच त्या आपली मते ठामपणे मांडत आल्या आहेत. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. अभिनेत्री आणि एक राजकारणीसोबतच कंगना रणौत या आता बिझनेसवुमन देखील झाल्या आहेत. त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. याची सुंदर झलक त्यांनी आपल्या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना दिली आहे.

कंगना रणौत यांनी मनालीच्या सुंदर खोऱ्यांमध्ये आपला स्वतःचा कॅफे उघडला आहे. या खास कॅफेचे उद्घाटन 14 फेब्रुवारी 'व्हॅलेंटाईन डे' च्या दिवशी करणार आहेत. कंगना रणौत यांनी आपल्या नवीन कॅफेचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांने वेड लावले आहे. आपल्या नव्या कॅफेमध्ये कंगना रणौत यांनी बॉलिवूडच्या एका टॉप अभिनेत्रीला आमंत्रित केले आहे. याची चर्चा चांगलीच सोशल मीडियावर रंगली आहे.

कंगना रणौत यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणला (Deepika Padukone) तिच्या जुन्या वचनाची आठवण करून दिली आहे. सध्या सोशल मिडिया एक जुना व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात कंगना रणौत, दीपिका पदुकोण आणि विद्या बालन दिसत आहेत. तेव्हा होस्ट त्यांना विचारतो की, तुम्हाला 10 वर्षात काय करायचे आहे? यावर दीपिका पदुकोण म्हणाली की, "मी जे करत आहे ते चालूच ठेवणार आहे."

मात्र यावर" कंगना रणौत यांनी खास उत्तर दिले होते. त्या म्हणाल्या होत्या की, "मला माझे स्वतःचे छोटे रेस्टॉरंट उघडायचे आहे. ज्यामध्ये जगभरातील मेनू असतील. मी वेगवेगळ्या ठिकाणांचे पदार्थ खाल्लेले आहेत. माझ्याकडे सर्व रेसिपी आहेत. मला जगात कुठेतरी स्वतःचा एक छोटासा कॅफेटेरिया उघडायचा आहे." कंगनाचे हे उत्तर ऐकून दीपिका पदुकोण लगेच म्हणाली होती की, "मी तुझी पहिली ग्राहक असेन." आता दीपिका पदुकोण कंगना रणौत यांच्या नव्या कॅफेची पहिली ग्राहक ठरेल का? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

कंगना रणौत यांचा कॅफे हिमालयाच्या खुशीत वसलेला आहे. हा प्रोजेक्ट कंगना यांच्या खूप जवळचा आहे. चाहत्यांसोबत कॅफेची झलक शेअर करताना त्यांनी एक हटके कॅप्शन देखील व्हिडीओला दिले आहे. त्यांनी लिहिलं की, "लहानपणीचे स्वप्न आज पूर्ण झाले, हिमालयाच्या कुशीत माझे छोटेसे कॅफे. द माउंटन स्टोरी, ही एक लव्ह स्टोरी आहे. " सध्या सोशल मीडियावर चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून कंगना यांच्यावर प्रेमाचा, शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी नाल्यात उतरलेल्या कामगाराच्या नशिबी मृत्यू

ममता बॅनर्जी थेट सुप्रीम कोर्टात वकीलाच्या भूमिकेत, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप, न्यायालयात काय घडलं? VIDEO

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण; कायद्यातील त्रुटींवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर हल्लाबोल

मोठी बातमी! भाजपने आपले 66 नगरसेवक अज्ञातस्थळी हलवले|VIDEO

राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार की लांबणार? शरद पवारांच्या वक्तव्यानंतर नवा ट्विस्ट, VIDEO

SCROLL FOR NEXT