Disha Patani : दीपिका अन् प्रियांका चोप्रानंतर दिशाची उंच भरारी; हॉलिवूड गाजवणार,'त्या' फोटोनं वेधलं लक्ष

Disha Patani Hollywood Debut: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी आता हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या तिचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Disha Patani Hollywood Debut
Disha PataniSAAM TV
Published On

बॉलिवूडची अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani ) कायमच तिच्या लूक आणि अभिनयासाठी ओळखी जाते. तिने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहे. दिशाचा मोठा चाहता वर्ग आहे. तिने आपल्या स्टाइलने चाहत्यांना वेड लावले आहे. तिचा गॅमरस अंदाज पाहून चाहते नेहमीच घायाळ होतात. सध्या अभिनेत्री एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री दिशा पटानीचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. यावरून दिशा पटानी आता हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दीपिका अन् प्रियांका चोप्रानंतर आता दिशा पटानी हॉलिवूडमध्ये झळकणार आहे. शूटिंगच्या सेटवरचा तिचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिशा पटानीने मात्र याबाबत अद्याप कोणतीही घोषणा केली नाही आहे. दिशा पटानीने आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र या बातमीने दिशाच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. फोटोमध्ये दिशा पटानी 'फास्ट अँड फ्युरियस' स्टार टायरेस गिब्सन आणि अभिनेता हॅरी गुडविन्स सोबत पाहायला मिळत आहे. हे तिघे सध्या मेक्सिकोतील डुरंगो येथे एका आगामी वेब सीरिजचे शूटिंग करत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, वेब सीरिजच्या माध्यमातून दिशा पटानी हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दिशा पटानी 2025 मध्ये 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या या चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. दिशाने आजवर अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. तिचा 'कल्की : २८९८ एडी' खूप गाजला होता.

Disha Patani Hollywood Debut
Saif Ali Khan: तैमूरचा जीव मोलकरणीने वाचवला, मदतीसाठी सैफ धावला; हातावर-मानेवर वार, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com