Kangana Ranaut On Ram Lalla Idol Instagram
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut News: श्रीरामाची मूर्ती पाहून कंगणा रणौत भारावली; सोशल मीडियावर केली खास पोस्ट

Chetan Bodke

Kangana Ranaut On Ram Lalla Idol At Ram Mandir In Ayodhya

अयोध्येतील राम मंदिरामध्ये येत्या २२ जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याविषयी सर्वत्र आनंदाचे आणि उत्सवाचे वातावरण आहे. या सोहळ्याला अवघे काही दिवसच शिल्लक असताना काल दुपारी रामलल्लांच्या मूर्तीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. संपूर्ण मुर्तीचे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच अभिनेत्री कंगना रणौतने रामलल्लांची मूर्ती पाहून तिच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Ayodhya)

कंगना रणौत कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतंच कंगनाने इन्स्टाग्राम एक स्टोरीवर रामलल्लांचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना ती मंत्रमुग्ध झालेली दिसली. तिने रामलल्लाची मूर्ती तयार करणाऱ्या अरुण योगीराज यांचंही आपल्या स्टोरीमध्ये कौतुक केलं आहे. इन्स्टा स्टोरीमध्ये कंगनाने लिहिलंय की, "प्रभू राम त्यांच्या बालपणी कसे दिसायचे, असा प्रश्न मला नेहमीच पडायचा. आज या मुर्तीने माझी कल्पना जिवंत केली. अरुण योगीराज तुम्हाला खूप खूप आशीर्वाद." (Ram Mandir)

Kangana Ranaut On Ram Lalla Idol At Ram Mandir In Ayodhya

आपल्या पुढच्या इन्स्टा स्टोरीवर कंगनाने लिहिलंय की, "किती सुंदर आणि मनमोहक मूर्ती आहे. सुंदर मुर्ती बनवण्यासाठी अरुण योगीराज यांच्यावर किती तणाव असेल. आणि परमेश्वराला दगडामध्ये सामावून घेणं ही खूप कठीण गोष्ट आहे. काय म्हणावं, ही देखील एक रामाचीच कृपा आहे. अरुण योगीराज श्री रामजींनी स्वतः तुम्हाला दर्शन दिले आहे... तुम्ही धन्य आहात." अशी पोस्ट करत कंगनाने रामलल्लाची मूर्ती साकारणाऱ्या अरुण योगीराज यांचं कौतुक केलंय. (Bollywood Actress)

Kangana Ranaut On Ram Lalla Idol At Ram Mandir In Ayodhya

राम मंदिरात स्थापनेसाठी रामलल्लाच्या तीन मूर्ती बनवण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये शिल्पकार अरुण योगीराज यांच्या मूर्तीची निवड करण्यात आली होती. ही मूर्ती ५१ इंच उंच आहे. रामलल्लाच्या मूर्तीत त्यांचे बालस्वरूप सुंदर दिसतेय. या मूर्तीमध्ये ओम, गणेश, चक्र, शंख, गदा, स्वस्तिक यासह अनेक धार्मिक चिन्हे दिसतात. अरुण योगीराज यांनी काळ्या पाषाणात रामलल्लाची मूर्ती साकारली आहे. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

SCROLL FOR NEXT