Kajol Wants To Ajay Devgn On Trial Instagram
मनोरंजन बातम्या

Kajol Wants To Ajay Devgn On Trial: लग्नाच्या २३ वर्षानंतर काजोलने बोलून दाखवली मनातील सल; म्हणाली, ‘मी अजयच्या विरोधात...’

Kajol And Ajay Devgn: चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अजय देवगणवर खटला दाखल करेल, असे वक्तव्य केले आहे.

Chetan Bodke

Kajol Wants To Put Husband Ajay Devgn On Trial: काजोल आणि अजय देवगण बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध जोडींपैकी एक जोडी. या दोघांनीही आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मन जिंकली आहे. काजोल आणि अजयची लव्ह केमिस्ट्री ही नेहमीच प्रेक्षकांना आवडते. काजोलने नुकतंच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अजय देवगणवर खटला दाखल करेल, असे वक्तव्य केले आहे. तिच्या या उत्तराने चाहत्यांना मात्र धक्का बसला आहे.

काजोल नुकतीच ‘लस्ट स्टोरी २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामुळे काजोल सध्या तुफान चर्चेत आली आहे. काजोल सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. जर तुला कोणत्याही एका व्यक्तिविरोधात खटला दाखल करायचा असेल, तर तू कोणत्या व्यक्तीविरोधात खटला करशील? असा प्रश्न विचारण्यात आला.

तर त्यावर तिने थेट पती अजय देवगणचं नाव घेतलं. ‘मी अजयविरोधात गुन्हा दाखल करणार आहे. त्यासाठी कोणतं मला कारण देण्याची गरज नाही. तो माझा नवरा आहे हेच कारण पुरेसं आहे. तोसुद्धा माझे हे आरोप कबूल करेन.’ असं म्हणत काजोलने अजयवर आरोप केले आहेत.

काजोलचं ओटीटीवर पदार्पण

काजोल नेहमीच आपल्या हिट चित्रपटांमुळे चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. काजोलचं ओटीटी पदार्पण प्रेक्षकांसाठी एक आनंदाचा धक्काच आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत काजोलने ओटीटी पदार्पणावर भाष्य केलं. ‘मी स्वतःला कधीच मोठी अभिनेत्री समजंत नाही. मला नेहमी असं वाटतं की, माझा रोल हा आधीपेक्षा चांगला होऊ शकतो. त्यामुळे तो चित्रपट आहे की वेबसीरीज त्याचा कोणताही फरक पडत नाही. जर माझ्या बरोबर चांगला अभिनेता असेल आणि उत्तम दिग्दर्शक असेल तर मी चांगलं काम करू शकते. त्यामुळे ती कलाकृती देखील उत्तम होते.’ असं काजोल म्हणाली.

काजोलची ‘द ट्रायल’ ही वेबसीरिज येत्या १४ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची चांगलीच उत्सुकता ताणली असून या चित्रपटात काजोल पहिल्यादांच एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच काजोल तिच्या भूमिकेविषयी म्हणाली, ‘सुपर्ण वर्मा हे बेबसीरिज दिग्दर्शक आहेत.

त्यांनी मला सांगितलं की ‘द गुड वाईफ’ ही विदेशी संकल्पना आहे. या संकल्पनेला आपल्या समाजात आणि संस्कृतीत सामावून घ्यावं लागेल. हे असे केल्याने वेबसीरिजची कथा प्रेक्षकांना आवडणार नाही. त्यामुळे मला असं वाटलं की, ही वेबसीरिज खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते. म्हणून मी वेबसीरिजसाठी होकार दिला.’ असं काजोल म्हणाली.

काजोल आणि अजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, काजोलचा नुकताच ‘लस्ट स्टोरी २’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अजयचा ‘दृश्यम ३’ देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. तर रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम’ चा सिक्वेल देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samantha Ruth Prabhu: समांथा रूथ प्रभूच्या लग्नातले अनसीन फोटो व्हायरल, पाहा सुंदर PHOTO

भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा; चंद्रकांत पाटील यांची मागणी| नेमके प्रकरण काय? VIDEO

Maharashtra Live News Update: - मुंबई महापालिका निवडणूकीसाठीच्या मतदारयादीसंदर्भात धक्कादायक माहिती समोर

Chhattisgarh Encounter : छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई; एनकाउंटरमध्ये ५ नक्षलवाद्यांचा खात्मा, DRG जवान शहीद

Virat Kohli Century: विराट कोहलीचं सलग दुसरं शतक, गौतम गंभीरची रिअ‍ॅक्शन व्हायरल

SCROLL FOR NEXT