Kajol Devgan And Nysa Devgan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kajol Devgan: न्यासाच्या बॉलिवूड पदार्पणावर काजोलने मौन सोडले, म्हणते 'अभिनयाचा विचार नाही तर...'

गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री काजोल देवगणची लेक न्यासा नुकतीच सोशल मीडियावर ट्रोल होत होती. अशातच ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, अशी सध्या चर्चा होत आहे.

Chetan Bodke

Kajol Devgan: गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री काजोल देवगणची लेक न्यासा नुकतीच सोशल मीडियावर ट्रोल होत असल्याची चर्चा होत होती. त्यावर तिने आपल्या लेकीला उत्तम सल्ला दिला होता की, 'सोशल मीडियावर जर तुम्ही सर्वाधिक ट्रोल होत असाल तरच तुमची सर्वत्र चर्चा होते. सध्या अशी अवस्था झाली की, जर ट्रोल होत नसाल तर प्रसिद्धही होऊ शकत नाही.'

अशातच ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, अशी सध्या चर्चा होत आहे. लेकीच्या पदार्पणावर आई काजोल म्हणते, “तिचा सध्या अभिनय करण्याचा कुठलाही विचार नाही. ती सध्या अभ्यास करत आनंद लुटत आहे.” काजोलने लेकीच्या बॉलिवूड पदार्पणावर आपली ही प्रतिक्रिया दिली आहे.

न्यासा सध्या स्वित्झर्लंडमध्ये ग्लिओन इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशनमध्ये इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटीचा अभ्यास करत आहे.

सध्या अजय ' दृश्यम 2' मुळे बराच चर्चेत आहे. काजोलचा आगामी सिनेमा ‘सलाम वेंकी’ ९ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. आमिर या सिनेमामध्ये पाहुणा कलाकार म्हणून झळकणार आहे. याशिवाय राजीव खंडेलवाल, प्रकाश राज या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसतील. चित्रपटाचे दिग्दर्शन रेवतीचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Dress For Christmas: ख्रिसमस पार्टीसाठी रेड ड्रेसचे 5 लेटेस्ट पॅटर्न; तुम्ही दिसाल एकदम कडक

Maharashtra Live News Update: मुंबईतील बांद्रा न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी

Dhurandhar Collection : 'धुरंधर'ला तगडी टक्कर द्यायला येतोय 'अवतार', रणवीर सिंहचा चित्रपट 500 कोटींपासून काही पावले दूर

Smartphone: तुमच्या मोबाइलचं नेटवर्क सारखं गायब होतंय...या सोप्या ट्रिक वापरा

Pradnya satav : काँग्रेसला रामराम का केला? भाजपमध्ये प्रवेश करताचा प्रज्ञा सातव म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT