juhi chawla saam tv
मनोरंजन बातम्या

Juhi Chawla Tweet: 'मुंबईत रात्रंदिवस एखाद्या गटारात राहतोय...', जुही चावलाचे ट्विट चर्चेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Juhi Chawla: बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री जुही चावलाने 80/90 च्या दशकामध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. तिने 'कयामत से कयामत तक', 'डर', इश्क, सारख्या अनेक गाजणाऱ्या चित्रपटांमध्ये आपली महत्वाची भूमिका बजावली आहे. आता जरी ती अभिनय क्षेत्रापासून लांब असली तरी सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याचा वसा सोडलेला नाही.

आपल्या अभिनयासोबतच काही खास गोष्टींवर आपले मत ही ती मांडत असते. मात्र, ती सध्या चित्रपटामुळे नाही तर आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. यापूर्वी देखिल जुहीने 5जी वरुन केलेल्या ट्वीटमुळे तिला न्यायालयाने फटकारले होते, पण तिने पुन्हा एकदा आपल्या ट्वीटमुळे चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. तिने नुकतेच राज्याची राजधानी, ड्रिम सिटी असलेल्या मुंबईवर केलेल्या ट्वीटमुळे अभिनेत्री चर्चेचा मुद्दा ठरली आहे.

जुहीने नुकतेच सोशल मीडियावर एक पोस्ट करत मुंबईत पसरलेल्या दुर्गंधीविषयी भाष्य (Juhi Chawla Twitter Post) केले आहे. जुही म्हणते की, 'कोणच्या हे लक्षात आलंय का, मुंबईतील हवेत एक प्रकारची दुर्गंधी आहे. पूर्वी हा वास खाडीजवळून (वरळी आणि वांद्रा, मिठी नदीजवळ नेहमी अस्वच्छ प्रदूषित असणारे जलकुंभ) गाडी चालवताना हा वास येत होता. आता हा दुर्गंधीचा वास संपूर्ण दक्षिण मुंबईत पसरला आहे. एक विचित्र रासायनिक प्रदूषित हवा याठिकाणी आहे.'

जुहीने आपली तोफ एका ट्विटवरच नाही थांबवली तर आणखी एक ट्विट करत म्हणते, 'रात्रंदिवस आपण एखाद्या गटारात राहत आहोत असे वाटत आहे.' अभिनेत्रीच्या या ट्विटवर चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया ही दिल्या आहेत.

जुहीच्या ट्विटला मुंबईकरांनी आपला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी तिच्यावर टिका करत म्हटले की, 'असं वाटतंय की तू तुझ्या स्वप्नातल्या जगातून बाहेर येत आहेस. कृपया राग मानून घेऊ नको, तू अजूनही माझी आवडती अभिनेत्री आहेस. पण मुंबई अजूनही तशीच आहे, बदल तुझ्यात होतो आहे. तू आता लक्ष देऊ लागली आहेस.'

तर आणखी एक युजर बोलतो, 'बॉलिवूडने लेक्चर देण्यापेक्षा झाडं लावायला सुरुवात करावी.' काहींनी तिच्या कमेंट बॉक्समध्ये बीएमसीला टॅग करत कमेंट केल्या आहेत. सोबतच तिला दुसऱ्या शहरात राहण्याचा सल्ला दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे ३५६ धावांची 'विराट' आघाडी; रोहितसेना पिछाडीवर!

SCROLL FOR NEXT