Jaya Bachchan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jaya Bachchan: पापाराझींवर जया बच्चन भडकल्या, ट्रोलर्सच्या निशाण्यावर

जया बच्चन पुन्हा आल्या सोशल मीडिया यूजर्सच्या रडारवर.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: जया बच्चन (Jaya Bachchan) पुन्हा एकदा सोशल मीडिया (Social Media) यूजर्सच्या निशाण्यावर आल्या आहेत. मुंबईमध्ये पार पडलेल्या 'लॅक्मे फॅशन वीक'च्या (Lakme Fashion Week) शेवटच्या दिवशी जया बच्चन आणि नात नव्या नवेली नंदा यांनी कार्यक्रमाला एकत्रित उपस्थिती लावली होती. दरम्यान मीडिया आणि पापाराझींनी त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली, त्यावर अभिनेत्री जया बच्चन यांना राग आला. जया बच्चन नव्या नवेलीसोबत जाताना दिसताच पापाराझी फोटो काढण्यासाठी त्यांच्या जवळ गेले. जया बच्चन कॅमेरा पाहताच त्यांच्याकडे बोट दाखवत पापाराझींना म्हणतात, 'बरं झालं धडपडलास, पुढच्या वेळी जोरात खाली पडशील अशी अशा करते.' त्यानंतर विचारतात, 'तुम्ही कोण आहात? तुम्ही मीडियाचे आहात का?'

जया बच्चन यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहे. व्हिडिओसमोर आल्यानंतर एका युजरने कमेंट केली, 'तुम्ही त्यांना का कव्हर करता? त्या नेहमी असे बोलत असतात. त्यांना इतकं महत्त्व देऊ नका, कव्हर करू नका.

जया बच्चन यांचे नव्यासोबत चांगले संबंध आहेत. नुकत्याच जया बच्चन नव्या करत असलेल्या पॉडकास्ट 'व्हॉट द हेल नव्या'मध्ये मुलगी श्वेता बच्चनसोबत दिसत आहे. शोच्या एका एपिसोडमध्ये, जया बच्चन यांनी सांगितले की, त्यांचा नातू अगस्त्य नंदा अनेकदा 'कभी खुशी कभी गम' पाहतो आणि त्यांचा चेष्टा करतो.

अलीकडेच जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा 80 वा वाढदिवस त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह साजरा केला. जया बच्चन यांनी अभिषेक बच्चनसह 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटवर जाऊन अमिताभ बच्चन यांना सरप्राईज देखील दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT