Foods Storage Tips In Fridge: फ्रिजमध्ये 7 पदार्थ चुकूनही ठेवू नका : आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

Manasvi Choudhary

फ्रिज

अन्नपदार्थ, भाज्या आणि फळे ताजी राहावीत यासाठी फ्रिजचा वापर केला जातो. परंतु तुम्हाला माहितीये का? फळे, भाज्या योग्य रित्या फ्रिजमध्ये न ठेवल्यास खराब होऊ शकतात.

Foods Storage Tips In Fridge | SAAM TV

फ्रिजमध्ये कोणते पदार्थ ठेवू नये?

फ्रिजमध्ये कोणते पदार्थ ठेवणे टाळावे ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Foods Storage Tips In Fridge

टोमॅटो

फ्रिजमध्ये टोमॅटो ठेवणे टाळावे. फ्रिजमध्ये टोमॅटो ठेवल्याने त्याचा पोत खराब होतो. टोमॅटो मऊ पडतात आणि त्याची चव बिघडते.

tomato | pinterest

बटाटे

बटाटे फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातील स्टार्चचे रूपांतर साखरेत होते, ज्यामुळे बटाट्याची चव बदलते आणि ते लवकर खराब होतात.

potato | pinterest

कांदे

फ्रिजमधील थंड आणि ओलाव्यामुळे कांदे लवकर कुजतात आणि त्यांना बुरशी लागते. कांदे नेहमी हवेशीर ठिकाणी साठवून ठेवावे.

Onion | yandex

केळी

केळी फ्रिजमध्ये ठेवल्यास ती काळी पडतात त्यामुळे केळी फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे.

Banana

तुळस आणि तुळशीची पाने

तुळशीची पाने फ्रिजमधील इतर अन्नाचा वास शोषून घेतात आणि फ्रिजमधील थंड तापमानामुळे काळी व लवकर सुकतात.

Basil leaves | pinterest

ब्रेड

ब्रेड फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे. ब्रेड फ्रिजमध्ये ठेवल्यास कडक व कोरडा पडतो.

Bread | pinterest

मध

मध फ्रिजमध्ये ठेवल्यास कडक होतो. शुद्ध मध नैसर्गिकरीत्या हवाबंद बरणीत खोलीच्या तापमानावर दीर्घकाळ टिकतो.

Honey | pinterest

NEXT: Guava Benefits For Diabetes And Cholesterol: दररोज पेरू खाल्ल्याने रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलवर काय परिणाम होतो?

Benefits Of Guava | pintrest
येथे क्लिक करा...