मुंबई: येत्या दिवाळीत शिवभक्तांसाठी अभिजीत देशपांडे दिग्दर्शित आणि सुनील फडतरे निर्मित 'हर हर महादेव' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे (Marathi Movie). भारतीय चित्रपसृष्टीत कधीही न झालेला अनोखा प्रयोग या चित्रपटाच्या माध्यमातून होणार आहे (Marathi Entertainment News). हा चित्रपट एकाचवेळी पाच भाषांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतीय इतिहासातील एक सर्वश्रुत असलेले व्यक्तिमत्व बाजीप्रभू देशपांडे यांच्या व्यक्तिमत्त्वावर हा चित्रपट चित्रित करण्यात आला आहे. (Bollywood)
गेल्या काही दिवसांपूर्वी एका खास व्यक्तीच्या आवाजात चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भारदस्त आवाजात हा टीझर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला होता. प्रेक्षकांकडून टीझरला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. 'हर हर महादेव' चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे पात्र प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेने साकारले होते. सुबोध भावेने रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आपल्या खास शैलीत मुलाखत घेतली. कारण होते चित्रपटाचे. मुलाखतीला चाहत्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.
यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. महाराजांच्या जीवनपटावर आधारित चित्रपट काही भागांमध्ये विभागून प्रदर्शित करण्यात येईल. अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुलाखतीत केली. त्यामूळे चित्रपटाची चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करेल?, मुख्य भूमिकेत कोण दिसणार? या सर्वांचे प्रश्न येत्या काळात आपल्याला मिळणार आहेत.
चित्रपटात आवाज देण्याविषयी राज ठाकरे म्हणतात, '२००३ मध्ये शिव व्याख्याते बाबासाहेब पुरंदरे यांची मुलाखत घेतली तेव्हा अचानक माझ्याकडे चित्रपटातील व्हाईस ओवरची जबाबदारी आली होती. हे मुळात काम करणे माझी जबाबदारी नसली तरी मी याचा कधी विचारही केला नव्हता. चित्रपटात आवाज देणे आणि भाषण करणे यामध्ये खूप फरक आहे. हिंदी चित्रपटासाठी आवाज देताना मला थोडे अवघड गेले.'
तसेच ते पुढे म्हणतात, 'शूटिंग दरम्यान माझे आणि दिग्दर्शकांचे थोडे भांडणही झाले असते. हिंदीसाठी काम करताना मी दिग्दर्शकांना चित्रपटाची जबाबदारी माझ्यावर सोडा असे बोललो. रेकॉर्डिंगवेळी मी आणि अजित भूरे सकाळी स्टुडिओत गेलो होतो. चित्रपटाचे रेकॉर्डिंग दिग्दर्शकांच्या आणि माझ्या मनाप्रमाणे झाले. नक्कीच चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करेल अशी आशा आहे.'
सोबतच यावेळी आपल्या चित्रपटाविषयी वेगवेगळ्या गोष्टींना उजाळा ही देण्यात आला. चित्रपट दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत्या २५ ऑक्टोबरला येणार आहे. चित्रपटाविषयी सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.