Jacqueline Fernandez Sukesh Chandrasekhar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Jacquline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसच्या जामिनावरील निर्णय तूर्त टळला, आता मंगळवारी सुनावणी

जॅकलिनच्या तुरुंगवास किंवा जामिनाचा निर्णय ११ नोव्हेंबरला अर्थात आज येणार होता. मात्र तो, निर्णय आता पुढे ढकलण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Jacquline Fernandez Money Laundering Case: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसला आज जेल मिळणार की बेल यासंबंधित आज सर्वात मोठा निर्णय अपेक्षित होता. दिवाळीपूर्वी २०० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने जॅकलिनला १० नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. गुरुवारी दिल्लीतील पटियाला न्यायालयात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची सुनावणी पार पडली. जॅकलिनच्या तुरुंगवास किंवा जामिनाचा निर्णय ११ नोव्हेंबरला अर्थात आज येणार होता. मात्र तो, निर्णय आता पुढे ढकलण्यात आला आहे.

आता मंगळवार, १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता निकालाची सुनावणी करण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले. ईडीने कोर्टात जॅकलिनच्या जामीन अर्जाला विरोध दर्शवला आहे. ईडीने सांगितले की, जॅकलिनने तपासादरम्यान ईडीला सहकार्य केले नव्हते. पुरावे समोर आल्यावरच जॅकलिनने सर्व आरोपांची कबुली दिली आहे. सुकेश चंद्रशेखर ठग असल्याचे जॅकलिनला ठाऊक होते, हे ईडीने सांगितले आहे. तो ठग असल्याचे माहित असून देखील ती त्याच्याकडून बऱ्याचदा महागडे गिफ्ट घेत होती.

कोर्टात सुनावणी दरम्यान जॅकलिनच्या वकीलांनी सांगितले की, तिने न्यायालयाला सुनावणी दरम्यान सहकार्य केले आहे. सोबतच ईडीने जॅकलिन देश सोडून जाण्याचा आरोपही करत होती. जॅकलिनच्या वकीलांनी सांगितले की, तिने कोर्टात स्वत:ला आत्मसमर्पण केले. न्यायालयानेच तिचा अंतरिम जामिन मंजुर करण्यात आला असून ईडीकडून त्रास दिला जात आहे, असा आरोप तिनं केला आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tesla Cars: ५०० किमी पेक्षा अधिक रेंज देणाऱ्या टेस्लाच्या सर्वोत्तम ५ मॉडेल्स

HSL Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी, पगार १,८०,००० रुपये, अर्ज कुठे अन् कसा करावा?

Vidhan Bhavan : विधिमंडळातील हाणामारी, जितेंद्र आव्हाडांच्या मुलीला टार्गेट; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत | VIDEO

'मुंबई के समंदर में डुबे डुबे के मारेंगे..' राज ठाकरेंच्या ओपन चॅलेंजवर निशिकांत दुबेंची पहिली प्रतिक्रिया | MNS v/s BJP

Maharashtra Live News Update: वाटद एमआयडीसी विरोधात आज होणार शेतकऱ्यांची जनआक्रोश सभा

SCROLL FOR NEXT