Jacqueline Fernandez Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jacqueline Fernandez: मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी कायम; कोर्टात नेमकं काय घडलं?

सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे नाव चर्चेत आहे.

Chetan Bodke

Jacqueline Fernandez: सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे नाव चर्चेत आहे. आज म्हणजेच 20 डिसेंबर रोजी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सुनावणीसाठी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात पोहोचली. पटियाला हाऊस कोर्टात जॅकलिनसोबत तिचे वकील प्रशांत पाटील आणि वकील शक्ती पांडे ही होते. यासोबतच सुकेश चंद्रशेखर सुद्धा न्यायालयात हजर झाला होता.

सध्या जॅकलिन फर्नांडिस चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. सोबतच नोरावर आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी आज पटियाला हाऊस कोर्टात आज तिची सुनावणी होती. विशेष म्हणजे सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिनचे वकीलही आज न्यायालयात चौकशीला हजर होते. एवढेच नाही तर जॅकलिनने परदेशात जाण्यासाठी कोर्टाकडे परवानगीही मागितली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॅकलिनने 23 डिसेंबरपासून बहरीनला जाण्यासाठी तिने परवानगी मागितली आहे. मात्र, सध्यातरी न्यायालयाने यावर कोणतेही उत्तर दिलेले नाही.

यापूर्वी 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात 12 डिसेंबर रोजी जॅकलिनही दिल्ली न्यायालयात हजर झाली होती. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 20 डिसेंबर 2022 पर्यंत पुढे ढकलली होती. अभिनेत्रीने सुकेशकडून 10 कोटी रुपयांच्या महागड्या भेटवस्तू घेतल्या होत्या.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुकेशने जॅकलीनच्या कुटुंबाला लक्झरी कार, 1.32 कोटी रुपयांच्या महागड्या वस्तू आणि 15 लाख रोख अशा अनेक महागड्या भेटवस्तूही दिल्या होत्या. जॅकलिन आणि सुदेश बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचेही बोलले जात होते. त्याचवेळी फसवणुकीचे प्रकरण वाढताच दोघांचेही इंटिमेट फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :तीन दिवसांपूर्वी उद्घाटन झालेला पलावा पूल पुलावरील रस्त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत

Amla Chutney : जेवणासोबत रोज लोणचं कशाला? घरीच करा चटपटीत आवळ्याची चटणी

OYO Hotel: कपल्सची होणार गोची? तासांवर रूम मिळणं होणार कठिण? VIDEO

Nagpur Tourism : नागपूरमधील विरंगुळ्याचे ठिकाण, 'येथे' घ्या क्षणभर विश्रांती

Shocking: 'ती'ओरडत राहिली पण..१० वर्षीय चिमुकलीचे नराधम पित्याने लचके तोडले, आईला कळताच..

SCROLL FOR NEXT