Hina Khan Goes Bald Amid Cancer Treatment Instagram
मनोरंजन बातम्या

Hina Khan : हिना खानने स्वत:च काढले डोक्यावरील केस, व्हिडीओ शेअर करत झाली इमोशनल

Hina Khan Goes Bald Amid Cancer Treatment : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अक्षरा अर्थात हिना खान गेल्या काही दिवसांपासून आपल्या हेल्थमुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने स्वत:च ट्रीमरने केस काढतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Chetan Bodke

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अक्षरा अर्थात हिना खान गेल्या काही दिवसांपासून आपल्या हेल्थमुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले. सध्या ती त्यावर उपचार घेत आहे. अभिनेत्री कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून हिना कायमच आपल्या खासगी आयुष्याबद्दलच्या अपडेट्स चाहत्यांना देत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी तिने केस कापतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. आता अभिनेत्रीने व्हिडिओमध्ये डोक्यावरील केस काढतानाचा व्हिडिओ शेअर केला.

हिना खानला तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले आहे. निदान होताच अभिनेत्रीवर उपचार सुरू आहेत. किमोथेरेपी दरम्यान होणाऱ्या साईड इफेक्ट्समुळे तिने डोक्यावरील केस काढण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात अभिनेत्री स्वत:ला स्ट्रॉंग ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिच्यावर किमोथेरेपी झाली होती. या दरम्यान, अभिनेत्रीने डोक्यावरील केस कापले होते. आता त्यानंतर तिने स्वत: डोक्यावरील केस काढताना दिसत आहे.

हिना खानने इन्स्टाग्रामवर केस कापतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हिना ट्रीमरने केस काढताना दिसत आहे. ट्रीटमेंट सुरू असताना केस हातात येत असल्याचे तिने दाखवले. केस हातात येत असल्यामुळेच तिने टक्कल केल्याचे सांगितले. व्हिडिओमध्ये अभिनेत्री तिच्या भावना व्यक्त करताना दिसते. भावना व्यक्त करतानाचा व्हिडिओ तिने इन्स्टावर स्वत: शेअर केला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत तिला काळजी घेण्यास सांगितले आहे.

डोक्यावरील केस कापताना अभिनेत्री इमोशनल झाली होती. व्हिडिओवर अनेक युजर्सने तिला चॅम्पियन अशी कमेंट केली आहे. व्हिडिओवर सेलिब्रिटी आणि फॅन्स कमेंट करत तिला लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT