Disha Patani Struggle Story Instagram/@dishapatani
मनोरंजन बातम्या

Disha Patani Struggle Story: अवघ्या 500 रूपयांत मायानगरी गाठली, आज आहे कोट्यवधीची मालकीण, असा आहे दिशाच्या अभिनय क्षेत्रातला रंजक प्रवास

Disha Patani Bollywood Career: आजवर दिशाने अनेक जाहिराती, मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रापर्यंत आपली मजल मारली. तिचा बॉलिवूडमधील प्रवास काही साधा सोपा नव्हता.

Chetan Bodke

Disha Patani Birthday: ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ आणि ‘बागी २’ सारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री दिशा पटनीचा आज ३१ वा वाढदिवस आहे.. अभिनेत्री नेहमीच तिच्या फिटनेस, बोल्डनेस मुळे कायमच चाहत्यांच्या मनात आहे. आजवर दिशाने अनेक जाहिराती, मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रापर्यंत आपली मजल मारली. तिचा बॉलिवूडमधील प्रवास काही साधा सोपा नव्हता. तिने अवघ्या ५०० रू.मध्ये मुंबई गाठली असली तरी, आज कोट्यावधींची मालकीण आहे.

बॉलीवूडची सर्वात फिट अभिनेत्री मानली जाणारी दिशा पटनी हिचा जन्म 13 जून 1992 रोजी उत्तर प्रदेशातील बरेली येथे झाला. सलमान खान, टायगर श्रॉफसह अनेक बड्या कलाकारांसोबत काम केलेल्या दिशाला कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. 

दिशा पटनीला सुरूवातीला अभिनयात रस नव्हता. या अभिनेत्रीला लहानपणापासूनच शास्त्रज्ञ (Scientist) व्हायचे होते. तिने लखनौच्या एमिटी युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पुर्ण केलं होतं. पण तिचं नशिब एका वेगळ्याच इंडस्ट्रीमध्ये होतं. कॉलेजमध्ये असताना तिने मॉडेलिंगला सुरुवात केली आणि ग्लॅमर दुनियेत आपले स्वत:चे नाव कमावले. अभिनय क्षेत्रात करियर करण्यासाठी दिशाने फार स्ट्रगल केलं होतं, ती एका मुलाखतीत म्हणाली, “शिक्षण अर्धवट सोडून मी मुंबईला आली. कोणत्याच ओळखीशिवाय या मायानगरीत राहणं सोप्प नाही. मी घरच्यांकडून एक ही पैसे न मागता फक्त ५०० रू. मी मुंबई गाठली.”

अभिनेत्री पुढे म्हणते, “माझ्यावर एकवेळ अशी होती की, माझ्याकडे असलेले सर्व पैसे संपले होते. मी कामासाठी खूप फिरले होते. जर काम मिळालं नाही तर, घरभाडं कसं देऊ याचा विचार नेहमीच करायचे. एका चित्रपटात एका भूमिकेसाठी मला निवडण्यात आलं होतं पण ऐनवेळी दुसऱ्याच अभिनेत्रीची निवड करण्यात आली होती. तो माझा पहिला माझा चित्रपट होता, पण प्रत्येक गोष्टी मागे काही ना कारण असतं. आपल्याला मिळालेला नकार हा नेहमीच खंबीर बनवतो. आणि ही शिकवण मला सुरूवातीच्या काळातच मिळाली. ज्या गोष्टीसाठी आपल्याला नकार मिळाला आहे, त्यामागे तुम्ही आणखी मेहनत घ्या आणि स्वत:ला सिद्ध करा.” (Bollywood Actress)

एका जाहिरातीतून दिशा बॉलिवूडमध्ये आली, फार कमी वेळात ती खूपच प्रसिद्ध आहे. ‘एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं असून तिचा हा चित्रपट बराच प्रसिद्ध झाला. दिशाचा दुसरा चित्रपट ‘बागी २’ हा होता. दिशा या चित्रपटातून बरीच प्रसिद्ध झाली. दिशाचे मुंबईतील बांद्र्यामध्ये स्वतःचे आलीशान घर आहे, त्याची किंमत 5 कोटींहून अधिक आहे. सोबतच तिच्याकडे आलीशान गाड्या आणि इतर संपत्ती देखील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT