Deepika Padukone Saam TV
मनोरंजन बातम्या

Deepiaka Padukone: दीपिकाला फिफा विश्वचषकात मिळाली विशेष जबबादारी, जगातील पहिल्या अभिनेत्रीने पटकावला 'हा' मान

FIFA विश्वचषक 2022च्या अंतिम सामन्यातील विशेष जबाबदारी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणवर सोपवण्यात आली आहे.

Chetan Bodke

Deepiaka Padukone: FIFA विश्वचषक 2022 कतारमध्ये सुरु आहे. सोशल मीडियावर दररोज फिफामधील सामन्यांचा बोलबाला असतो. फिफा विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना १८ डिसेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. या अंतिम सामन्यातील विशेष जबाबदारी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणवर सोपवण्यात आली आहे.

दीपिका पदुकोणच्या हस्ते अंतिम सामन्याच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात येणार आहे. FIFA विश्वचषक 2022 (FIFA World Cup Qatar 2022) च्या अंतिम सामन्याच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यासाठी दीपिका पदुकोण ही पहिली भारतीय बॉलिवूड अभिनेत्री आहे.

दीपिकाची ओळख फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे. दीपिका पदुकोणने बॉलिवूडसोबतच हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. यानंतर आता दीपिका फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्यासाठी कतारमध्ये फिफा वर्ल्ड कप ट्रॉफीचे अनावरण करणार आहे.

मात्र याबाबत अद्यापही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिकाचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. 18 डिसेंबरपूर्वीच दीपिका कतारला रवाना होणार आहे. नुकत्याच झालेल्या फिफा सामन्यांपूर्वी नोरा फतेहीने परफॉर्म केला होता.

दीपिकाच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला आहे, दीपिकाने बॉलिवूड, हॉलिवूडसहित आता फिफा पुरस्कार सोहळ्यात आपली हजेरी लावणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी दीपिकाने काही जागतिक स्तरातील कंपन्याची ब्रॅंड एम्बेसिडर बनून काम केले होते.

अलीकडेच दीपिका पदुकोणचीही कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्युरी सदस्य म्हणून निवड झाली होती. यासोबतच दीपिका पदुकोणचे नाव गोल्ड ब्युटी रेशोमध्ये जगातील 10 सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये नाव आले होते. आता FIFA विश्वचषक 2022 च्या अंतिम ट्रॉफीचे अनावरण दीपिकाच्या होणार असल्याने देशवासीयांसाठी ही उर भरुन आणणारी गोष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मंत्री पंकजा मुंडे यांनी आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची घेतली भेट

बलात्काराचा आरोप असलेल्या पोलिसाकडून आत्मसमर्पण; डॉक्टर तरूणी आत्महत्या प्रकरणात बदने नेमकं काय म्हणाले?

BJP Leader Shot : भाजप नेत्यावर दिवसाढवळ्या धाडधाड गोळ्या झाडल्या, ५ जण घरात घुसलं अन्...

Ahmednagar Tourism : ऐतिहासिक ठिकाणी फिरायला खूप आवडते? मग, अहमदनगरमधील 'हे' ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट

Manoj Bajpayee : "फोटो खिंचवाने थोडी आये है..."; मनोज बाजपेयी पापाराझींवर संतापले, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT