Famous Actress SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actress : 'बिग बॉस' शोचे आमिष दाखवून प्रसिद्ध अभिनेत्रीला ११ लाखांचा गंडा, मुंबईत तिघांविरुद्ध गुन्हा

Actress Cheated Of 11 Lakh : प्रसिद्ध अभिनेत्रीची ११ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुंबईत तीन आरोपींनी अटक केली आहे.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्रीची ११ लाखांची फसवणूक

'बिग बॉस' शोचे आमिष दाखवून अभिनेत्रीला फसवले

मुंबईत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

साम टिव्ही प्रतिनिधी - संजय गडदे

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'बिग बॉस 2026' या रिअॅलिटी शोमध्ये तसेच नामांकित ब्रँडच्या जाहिरातींमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका २५ वर्षीय अभिनेत्री आणि उद्योजिकेची सुमारे साडेअकरा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी रक्षित कोठारी, वैशाली रक्षित कोठारी आणि डॉ. खुशी ठक्कर या तिघांविरुद्ध अपहरणासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.

तक्रारदार मूळची आसाममधील असून सध्या अंधेरीतील लोखंडवाला परिसरात राहते. ती अभिनेत्री असून स्वतःचा व्यवसायही सांभाळते. फॅशन आणि बॉलिवूड क्षेत्रात करिअर करण्याच्या प्रयत्नात असताना डिसेंबर २०२५ मध्ये तिची ओळख रक्षित कोठारी, वैशाली कोठारी आणि डॉ. खुशी ठक्कर यांच्याशी झाली. तिघेही 'परफेक्ट वुमन मॅगझिन' या संस्थेशी संबंधित असून त्यांनी तक्रारदाराला 'बिग बॉस 2026'मध्ये सहभागी करून घेण्यासह नामांकित ब्रँडच्या जाहिराती आणि फॅशन शोमध्ये काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी डिसेंबर २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीत विविध कारणे सांगून टप्प्याटप्प्याने सुमारे साडेअकरा लाख रुपये घेतले. असा आरोप करण्यात आला आहे.

मात्र, ठरलेल्या मुदतीत कोणतेही काम किंवा करार मिळवून देण्यात आला नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर आरोपी विविध कारणे सांगून टाळाटाळ करत राहिले. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर तक्रारदाराने पैसे परत मागितले, मात्र आरोपींनी रक्कम परत केली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर तक्रारदाराने कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेत तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी रक्षित कोठारी, वैशाली रक्षित कोठारी आणि डॉ. खुशी ठक्कर यांच्याविरुद्ध अपहरणासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्षित कोठारी हे मालाड (मार्वे रोड) परिसरात, वैशाली रक्षित कोठारी त्यांच्यासोबत राहतात, तर डॉ. खुशी ठक्कर या अंधेरीतील वर्सोवा-यारी रोड परिसरात वास्तव्यास आहेत. तिघांनाही लवकरच चौकशीसाठी समन्स बजावण्यात येणार असून त्यांनी अशा प्रकारे इतरांचीही फसवणूक केली आहे का, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महायुतीत बिघाडी! माजी मंत्री अन् राष्ट्रवादीच्या आमदारात जुंपली; आरोप-प्रत्यारोपानं मवाळमधील राजकारण तापलं

Maharashtra News Live Update: सांगलीत कार विहिरीत कोसळून एकाचा मृत्यू; दोन दिवसांनी मृतदेह सापडला

Skin Care: ओपन पोर्स कमी करुन चेहरा होईल नॅचरल ग्लोईंग, फक्त रात्री झोपताना ५ मिनिटांत लावा हा होममेड जेल

50 प्रभागांमधील निवडणुका रद्द! 6 महिन्यात पुन्हा निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश; कारण काय?

Business Ideas For Women: महिलांसाठी व्यवसायाची सुवर्ण संधी, हे १० बिझनेस जे तुम्ही घरातून करू शकता

SCROLL FOR NEXT