Bhumi Penekar On Saie Tamhankar  Saam Tv
मनोरंजन बातम्या

...म्हणून ती अद्भुत अभिनेत्री आहे, Saie Tamhankar च्या अभिनयावर Bhumi Pednekar फिदा

Priya More

Bhakshak Movie:

मराठी सिनेसृष्टीची 'बिनधास्त गर्ल' सई ताम्हणकर (Saie Tamhankar) सध्या तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. २०१४ हे वर्ष सई ताम्हणकरसाठी नक्कीच अभूतपूर्व ठरलं आहे. 'श्रीदेवी प्रसन्न ' पासून 'भक्षक'पर्यंत तिच्या अनस्टोबेल कामाची जादू ती कायम दाखवत राहिली आहे. नुकत्याच रिलीज झालेला तिचा 'भक्षक' चित्रपट (Bhakshak Movie) सध्या नेटफ्लिक्सवर नंबर वनवर ट्रेंड झाला. या चित्रपटामध्ये सई ताम्हणकरने बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरसोबत काम केले आहे. सईच्या अभिनयाची भुरळ अभिनेत्री भूमी पेडणेकरला (Bhumi Penekar) पडली आहे. भूमी पेडणेकरने सोशल मीडियावर पोस्ट करत सईसोबतच्या कामाचा अनुभव शेअर करत तिचे कौतुक केले आहे.

नेटफ्लिक्सवर भक्षक चित्रपट सध्या सांगले यश कमवत असून समीक्षकांसोबत प्रेक्षक या वेबसीरिजचे कौतुक करत आहेत. या चित्रपटातील सई ताम्हणकरच्या अभिनयाच्या चर्चा सर्वत्र होत आहे. २०२४ वर्षात दमदार कामाची सुरुवात तिने सुरू ठेवली आहे. बॉलीवूडमध्ये सई पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सई चर्चेत आली ती म्हणजे भूमीच्या सोशल मीडिया स्टोरीमुळे भक्षकचं अभूतपूर्व यश आणि सईच्या अभिनयाचं कौतुक अजूनही सुरूच आहे. सोबतीला तिच्या अभिनयाचं कौतुक भूमीने देखील केलं आहे.

भूमीला तिच्या एका चाहत्याने सईसोबत काम करण्याचा अनुभव विचारला होता. यावर उत्तर देताना तिने सांगितले की, 'मी सईच्या कामाची नेहमीच फॅन आहे. मी 'हंटर' पाहिला आणि तेव्हापासून आजपर्यंत तिच्या अभिनयाची चाहती आहे. तिच्या अभिनयाचा मी इतका आनंद घेतला होता जेव्हा मला पुलकितने सांगितलं सईसुद्धा भक्षकचा एक भाग आहे. तेव्हा मी सईसोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक होती. तिचा या चित्रपटातला एक भाग माझ्या खूप जवळचा आहे. जेव्हा ती बालिकागृहात प्रवेश करते आणि ज्या पद्धतीने तिने तो सीन केला आहे तेव्हा तो मला आणि सगळ्यांना भावुक करून जातो. अभिनयातील लालित्य आणि तिचे बोलके डोळे सगळं काही सांगून जातात आणि म्हणून ती अद्भुत अभिनेत्री आहे.'

मराठीच्या सोबतीने बॉलिवूडमध्ये उंच भरारी घेऊन सई ताम्हणकर भक्कमपणे पाय रोवून दोन्ही इंडस्ट्रीत काम करताना दिसतेय. विविध माध्यमातून अखंडपणे स्थित्यंतर काम करणारी अभिनेत्री म्हणून ती अष्टपैलुत्व अभिनयाने सगळ्यांची मन जिंकत आहे. एकीकडे कौतुकाचा वर्षाव होत असताना सई न थांबता सध्या वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी शूट करण्यात व्यस्त असून येणाऱ्या काळात ती अजून उत्तम प्रोजेक्ट घेऊन येणार यात काहीच शंका नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Personality Development: अधिक आत्मविश्वास आणि आकर्षक होण्यासाठी 7 मार्ग

Maharashtra News Live Updates: सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्याला पनवेल कोर्टात केलं हजर

Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

SCROLL FOR NEXT