Rashmika Mandanna Dressing Trolled  Instagram /@rashmika_mandanna)
मनोरंजन बातम्या

Rashmika Madanna: 'अगं काय कपडे घातले?', ट्रोलर्सने नॅशनल क्रशला थेट तुलना केली उर्फीसोबत

रश्मिका झी सिने अवॉर्ड्स 2023 च्या रेड कार्पेटवर दिसली. यादरम्यान अभिनेत्रीच्या ड्रेसची बरीच चर्चा झाली.

Chetan Bodke

Rashmika Madanna Dressing Trolled: रश्मिका मदान्ना ही दक्षिण आणि बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रश्मिका नॅशनल क्रश असल्याने तिच्या चाहत्यांच्या संख्येत देखील बरीच वाढ झालेली आहे. अलीकडेच, रश्मिका झी सिने अवॉर्ड्स 2023 च्या रेड कार्पेटवर दिसली. यादरम्यान अभिनेत्रीच्या ड्रेसची बरीच चर्चा झाली. काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये रश्मिका खूपच सुंदर दिसत होती. या ड्रेसमध्ये तिचा सर्वात बोल्ड अवतार दिसत होता. चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला असून तिच्या कपड्यांची बरीच चर्चा होत आहे.

रश्मिका मंदान्ना नुकतीच इटलीतील मिलान शहरातून परतली आहे. तेथील फॅशन वीकमध्ये ती सहभागी झाली होती. या कार्यक्रमात रश्मिका अनेक परदेशी कलाकारांना भेटली होती. त्या दरम्यानचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. भारतात आल्यानंतर, रश्मिका झी सिने अवॉर्ड्स 2023 मध्ये सहभागी होताच तिच्या लूकची चर्चा होऊ लागली.

इव्हेंटमध्ये रश्मिकाने काळ्या रंगाचा बॉडीकॉन शॉर्ट ड्रेस घातला होता ज्यामध्ये लांब ट्रेल होता. या ड्रेसमध्ये ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत होती. रश्मिकाने तिचा लूक हाय हिल्सचे सँडल्स, केसांची बन स्टाईल करत आणि न्यूड मेकअप करुन आपला लूक पुर्ण केला होता. सोबतच यावेळीही तिच्या किलर स्माईलने आपल्या चाहत्यांचे मन जिंकले.

अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी तिच्या लूकवर आपली प्रतिक्रिया दिली आहे, नेहमीप्रमाणे काही यूजर्सने तिला ट्रोल केले आहे, तर काहींनी तिचे कौतुक देखील केले आहे. एक यूजर म्हणतो, 'खूप सुंदर' तर दुसरा युजर म्हणतो, 'नॅशनल क्रॅश' म्हटला आहे.

तर तिच्या कपड्यांवरुन तिला ट्रोल देखील केले आहे. तर काहींनी तिला थेट उर्फी जावेदचीच उपमा दिली आहे. तर काही युजर्स म्हणतात रश्मिका आता बॉलिवूड अभिनेत्रींसारखीच वागते, असे म्हणत ट्रोल केले.

या अवॉर्ड शोमध्ये रश्मिका सोबत अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. यात क्रिती सेनन, पूजा हेगडे, बाबिल खान, विवेक अग्निहोत्री, पल्लवी जोशी, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासह अनेक स्टार्स दिसले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ₹२००० साठी आताच करा हे काम, अन्यथा २२वा हप्ता विसरा

Maharashtra Live News Update : अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

ZP Elections : मिनी विधानसभेचं बिगुल वाजणार, दोन की एकाच एकाच टप्प्यात निवडणूक? वाचा लेटेस्ट अपडेट

Maharashtra Politics: अजितदादांचा पुणेकरांसाठी मोठा वादा, देवेंद्र फडणीस म्हणाले - 'घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं'

Kite Making Ideas: मुलांच्या प्रोजेक्टसाठी पतंग बनवायचाय? या टीप्स फॉलो करा, ५ मिनिटांत झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT