Ananya Panday New Home Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ananya Panday: 25 वर्षांच्या अनन्याने खरेदी केलं स्वप्नातलं घर, धनत्रयोदशीला केला गृहप्रवेश; फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

Priya More

Ananya Panday Buy New House:

बॉलिवूडमध्ये (Bollywood) सध्या सगळीकडे दिवाळी पार्टी (Diwali Party) सुरू आहेत. या पार्टींमध्ये सेलिब्रिटी आपल्या ग्लॅमरस अंदाजमध्ये हजेरी लावत आहेत. अशामध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेंची (Actress Ananya Panday) यंदाची दिवाळी खूपच खास आहे. यामागचे कारण म्हणजे अनन्याचे एक स्वप्न पूर्ण झाले आहे.

अनन्याने आपल्या स्वप्नातील घर खेरदी केले आहे. त्यामुळे ती सध्या चर्चेत आली आहे. धनत्रयोदशीला अनन्याने आपल्या नव्या घरात गृहप्रवेश केला. अनन्याने सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करत आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

अनन्या पांडेने धनत्रयोदशी आपल्या नव्या घरात पूजा केली. त्याचसोबत तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवीन घराची झलक देखील दाखवली. नव्या घराचे फोटो शेअर करत अनन्याने एक हृदयस्पर्शी नोट देखील लिहिली आहे. नव्या घराच्या दारात नारळ फोडतानाचा व्हिडिओही तिने इन्स्टावर शेअर केला आहे.

अनन्याने इन्स्टावर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती नवीन घरामध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करताना दिसत आहे. पहिल्या फोटोमध्ये अनन्या पांडे पूजा करताना कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये ती घरात प्रवेश करण्यापूर्वी नारळ फोडताना दिसत आहे. फोटो शेअर करत अनन्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझे स्वतःचे घर! नवीन सुरुवात करण्यासाठी तुमच्या सर्वांच्या प्रेमाची आणि चांगल्या भावनांची गरज आहे. धनत्रयोदशीच्या शुभेच्छा.'

अनन्याच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांसोबत बॉलिवूड सेलिब्रिटींनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या पोस्टवर कमेंट करत शनाया कपूरने रेड हार्ट इमोजी कमेंटमध्ये पोस्ट केला आहे. तर टायगर श्रॉफने कमेंटमध्ये, 'व्वा, अभिनंदन अनन्या.' असे लिहिले आहे. तर अनन्याच्या एका चाहत्याने कमेंट्स करत लिहिले की, 'व्वा अभिनंदन, तुच्या नवीन घराबद्दलच्या शुभेच्छा दिल्याचा मला अभिमान वाटतो.' दुसर्‍याने लिहिले की, 'या सणासुदीची सुरुवात किती सुंदर आहे.' तिसऱ्याने लिहिले की, 'अभिनंदन माय डिअर.' बाकीच्या लोकांनीही नवीन घरात आल्याबद्दल अनन्याचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, अनन्या नुकताच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण ८' च्या तिसऱ्या पर्वात सारा अली खानसोबत सहभागी झाली होती. या शोच्या माध्यमातून दोघींनी आपली मैत्री, अफेअर, आदित्य रॉय कपूर, शुभमन गिलबद्दल अनेक खुलासे केले. अनन्या पांडे शेवटी आयुष्मान खुरानासोबत 'ड्रीम गर्ल 2'मध्ये दिसली होती. हा चित्रपट नुकताच OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित झाला. 'कॉल मी बे' आणि 'खो गये हम कहाँ' हे तिचे आगामी चित्रपट आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : अजित पवारांचा पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा

Pune Crime: पुण्यात 'लाडक्या बहिणी' असुरक्षित, ७ महिन्यांत २६५ बलात्काराच्या घटना; आरोपींवर कारवाई कधी?

Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात सेलिब्रिटींची मांदियाळी, भाऊंचं होतंय तोंडभरून कौतुक

Assembly Election: विधानसभेच्या मोर्चेबांधणीत मनसेची आघाडी! दसऱ्यानंतर राज ठाकरेंचा मेळावा; उमेदवारांची घोषणा करणार

Raigad Crime : रायगड हादरलं! १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल होताच पोलीस पाटील फरार

SCROLL FOR NEXT