Alia Bhatt On Fans Calling Ranbir Kapoor Toxic Instagram
मनोरंजन बातम्या

Koffee With Karan 8: रणबीरला टॉक्सिक म्हणणाऱ्यांना आलियाने सुनावलं; म्हणाली, ‘लोकांना फालतू गोष्टीमध्ये...’

Alia Bhatt on Ranbir Kapoor: लिपस्टिक वादावर आलिया भट्टने ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या सीझनमध्ये रणबीरला टॉक्सिक म्हणणाऱ्यांना आलियाने सुनावलं आहे.

Chetan Bodke

Alia Bhatt On Fans Calling Ranbir Kapoor Toxic

सध्या ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या सीझनची जोरदार चर्चा होत आहे. गेल्या एपिसोडमध्ये, करण जोहरच्या शोमध्ये करीना कपूर खान आणि आलिया भट्टने एकत्रित हजेरी लावली होती. यावेळी दोघींनीही आपल्या खासगी आयुष्यातील अनेक महत्वाचे खुलासे केले आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी आलिया तिच्या फॅशनमुळे प्रचंड चर्चेत आली होती. रणबीरला मेकअप आवडत नसल्यामुळे तो तिला पुसायला सांगतो. या व्हिडीओमुळे रणबीरला नेटकरी ‘टॉक्सिक पार्टनर’ म्हणाले होते. यावर आलियाने ‘कॉफी विथ करण’च्या ८व्या सीझनमध्ये भाष्य केलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या व्हायरल व्हिडीओबद्दल आलिया म्हणाली की, हा खूप छोटा मुद्दा होता, पण त्याला खूप मोठं करुन दाखवलं. त्या व्हिडीओची प्रचंड चर्चा झाली. त्यावर अनेक लेख लिहिले गेले. त्यावेळी रणबीरला नेटकरी ‘टॉक्सिक पार्टनर’ आणि ‘दबाव टाकणारा पार्टनर’ म्हणून त्याला बोलत होते. ते खूपच होत असल्याचे माझ्या टीमने मला सांगितले. त्यावर मी त्यांना बोलू देत असं म्हणाले. पण हे प्रकरण उगाच गंभीर बनवलं, जे खऱ्या अर्थी नव्हतं.” (Bollywood)

आलियाने शोमध्ये रणबीर कपूरला टॉक्सिक म्हणणाऱ्यांना अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘रणबीर अजिबात टॉक्सिक नाही, रणबीरचा टॉक्सिक म्हणून उल्लेख पाहून मला धक्का बसला. जगात असे अनेक मुद्दे आहेत, ज्यावर चर्चा होऊ शकते. पण लोकांना फालतु गोष्टीमध्ये आवड आहे. ज्याप्रकारे चर्चा होते, तसे काहीच नाही. रणबीरला लोक जसे समजतात तसा अजिबात नाही. लोकं जसा त्याच्याबद्दल विचार करतात, तसा तो नाही. त्या विचारसरणीपासून तो पूर्णपणे वेगळा आहे.’ अशी प्रतिक्रिया आलिया भट्टने दिली. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाड-इंदोर रेल्वे जमीन अधिग्रहण प्रकरणी बाधितांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक निष्फळ

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT