Alia Bhatt In Heeramandi Premiere Instagram
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt In Heeramandi Premiere: प्रीमियर ‘हिरामंडी’चा अन् चर्चा आलिया भट्टच्या सौंदर्याची; अभिनेत्रीचा लूक तुम्ही पाहिलात का?

Sanjay Leela Bhansali Heeramandi Premiere : अभिनेत्री आलिया भट्टने संजय लीला भन्साळीच्या ‘हिरामंडी’ वेबसीरीजच्या प्रीमियरसाठी उपस्थिती लावली होती. यावेळी अभिनेत्रीने खास लूक केला होता. सध्या तिच्या लूकची जोरदार चर्चा होत आहे.

Chetan Bodke

Alia Bhatt In Heeramandi Premiere

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट कायमच आपल्या अभिनयासाठी ओळखली जाते. तिच्या सौंदर्याची कायमच इन्स्टाग्रामवर जोरदार चर्चा होते. अशातच नुकतंच अभिनेत्रीने संजय लीला भन्साळीच्या ‘हिरामंडी’ वेबसीरीजच्या प्रीमियरसाठी उपस्थिती लावली होती. यावेळी अभिनेत्रीने खास लूक केला होता. सध्या तिच्या लूकची जोरदार चर्चा होत आहे. (Bollywood Actress)

आलिया भट्टने संजय लीला भन्साळीच्या ‘गंगुबाई काठियावाड’ चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटातील तिच्या गंगूबाई लूकची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. प्रीमियरवेळी आलियाने व्हाईट डायमंडने डिझाईन केलेला ड्रेस कॅरी केलेला होता. या स्टाईलमध्ये अभिनेत्री कमालीची सुंदर दिसत आहे. तिच्या ह्या ड्रेसवर बारीक नक्षीकाम केलेली दिसत आहे. कट स्लीव्ह सूट आणि नेट दुपट्टा तिने कॅरी केली होती. (Bollywood News)

आलिया भट्टने व्हाईट शरारा सूट आणि तिच्या क्यूट लूकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. शरारा सूट आउटफिटसोबत मॅचिंग ज्वेलरीही तिने कॅरी केलेले दिसत आहे. आलिया भट्ट कायमच इन्स्टाग्रामवर स्टायलिश लूकमध्ये नवनवे फोटो शेअर करत असते. तिच्या लूकची नेहमीच चर्चा होत असते. तिच्या सौंदर्याची फक्त चाहत्यांकडूनच नाही तर अनेक सेलिब्रिटींकडूनही कौतुक केले जाते. संजय लीला भन्साळीच्या ‘हिरामंडी’ वेबसीरीजच्या प्रीमियरसाठी अवघं बॉलिवूड अवतरलं होतं. सलमान खान, आलिया भट्ट, विकी कौशल, रेखा, जेनेलिया देशमुख, सिद्धार्थ (आदिती रावचा बॉयफ्रेंड), अमृता खानविलकर, मन्नारा चोप्रा सह अवघं बॉलिवूड यावेळी अवतरलं होतं. (Web Series)

भव्य दिव्यता, रोमान्स आणि ड्रामा असलेल्या ‘हिरामंडी’ वेबसीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत, सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, आदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, अध्यायन सुमन, शेखर सुमन, फरदीन खान, संजीदा शेख आणि ताहा शाह बदुशा आहे. 'हीरमंडी : डायमंड बझार' ही सीरिज येत्या १ मे रोजी ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या वेबसीरिजच्या माध्यमातून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ओटीटीविश्वात पदार्पण करत आहेत. नेटफ्लिक्सवरील ही अत्यंत महागड्या वेबसीरिजपैकी एक वेबसीरीज असल्याचं बोललं जात आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

SCROLL FOR NEXT