Alia Bhatt Saam Tv
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt: आलियाचे करियरबद्दल स्पष्ट मत, लग्न आणि मातृत्वावर म्हणते...

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींसाठी २०२२ या वर्षात आपल्या चाहत्यांना गुड न्यूज देत सुखद धक्के दिले.

Chetan Bodke

Alia Bhatt: बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींसाठी २०२२ या वर्षात आपल्या चाहत्यांना गुड न्यूज देत सुखद धक्के दिले. या गुड न्यूजमध्ये रणबीर- आलियाच्या बातमीने सर्वांचेच लक्ष वेधले. रणबीर- आलियाने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर लग्नाला वर्षही पुर्ण होत नाही तोच त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म देत सर्वांचेच लक्ष वेधले.

या वर्षातील सर्वाधिक ट्रोल झालेला चित्रपट म्हणजे, 'ब्रह्मास्र'. 'ब्रह्मास्र' चित्रपटाने या वर्षात अनेक कोटींचा गल्ला जमवत आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

सहसा बॉलिवूड अभिनेत्री आपल्या करिअरच्या शिखरावर असताना लग्नाचा निर्णय सहसा टाळतातच. पण याला आलिया मात्र अपवाद आहे. प्रत्येक कलाकार आपला निर्णय स्वतंत्र्य घेत असतो. आलिया भट्टने नुकतीच एका इंग्रजी वेबसाईटला मुलाखत दिली.

या मुलाखतीत तिने फिल्मी करियर खासगी आयुष्याविषयी देखील मनमोकळा संवाद साधला होता. यावेळी आलियाला मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आले की, 'तिने करिअरच्या शिखरावर असताना लग्नाची घाई का केली आणि आई होण्याचा निर्णय इतक्या लवकर का घेतला?'

यावर आलिया म्हणते, "होय, करिअरच्या शिखरावर पोहोचल्यानंतर मी लग्न करून आई होण्याचा निर्णय घेतला. पण लग्न करून किंवा आई झाल्यावर माझ्या कामावर त्याचा परिणाम होईल असे कोणाला वाटते? आणि तसं झालं तरी मला त्याची पर्वा नाही. एक कलाकार म्हणून माझा स्वतःवर विश्वास आहे. तुम्ही मेहनत केलीत, आणि सर्वोत्तम कलाकार असाल तर तुम्हाला इंडस्ट्रित प्रमुख भूमिका मिळते. शेवटी हा तुमचा वैयक्तिक प्रश्न असतो तुम्हाला कधी काय करायचे आहे." यासोबतच आलियाने तिच्या इतरही खासगी गोष्टी शेअर केल्या आहेत.

आता आलिया लवकरच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला प्रेक्षक किती प्रतिसाद देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT