Alia Bhatt SAAM TV
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt : 'राहा 'चे सर्व फोटो डिलीट; लेकीसाठी आलियानं उचललं मोठं पाऊल, नेमकं कारण काय?

Alia Deleted Photos Of Raha : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने लेक राहाचे सर्व फोटो सोशल मीडियावरून डिलीट केले आहेत. यामागचे नेमकं कारण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूडचे पावर कपल आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'लव्ह अँड वॉर' यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. मात्र आता आलियाच्या एका कृतीमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.आलियाने लेक राहा (Raha Kapoor) कपूरचे सोशल मीडियावरील सर्व फोटो डिलीट केले आहेत. यामुळे सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

आलिया आणि रणबीरची लेक राहाचे चाहते दिवाने आहे. तिचे क्यूट फोटो आणि व्हिडीओ नेहमी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. तसेच अभिनेत्री आलिया भट्ट देखील इन्स्टाग्रामवर राहाचे फोटो शेअर करत असते. राहा आलिया आणि रणबीरसोबत अनेक वेळा पापाराझींना स्पॉट होते. ती अनेक वेळा त्यांच्याशी संवाद देखील साधताना पाहायला मिळते.

नेमकं कारण काय?

मीडिया रिपोर्टनुसार, आलिया भट्टने राहाचा चेहरा दिसत असणारे सर्व फोटो इन्स्टाग्रामवरून हटवले आहेत. याचे करण असे बोले जात आहे की, कुटुंबाच्या आणि लेकीच्या प्रायव्हसी आणि सुरक्षिततेचा विचार करून आलियाने हा निर्णय घेतला आहे. आलियाने आता पापाराझींना देखील राहाचे फोटो काढण्यास मनाई केली आहे. असे देखील बोले जात आहे की, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर आलियाने आपल्या कुटुंबासाठी हा निर्णय घेतला असल्याचे बोले जात आहे.

आलिया भटही बॉलिवूडची सुपरस्टार आहे. आजवर तिने अनेक हिट चित्रपट केले आहेत. 'स्टुडंट ऑफ द इअर ' मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. लेक राहाचे फोटो सोशल मिडियावरून हटवल्यावर चाहते तिच्या कृतीला पाठिंबा देत आहेत. चाहते आता आलियाचा आगामी चित्रपट 'लव्ह अँड वॉर' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात आलियासोबत रणबीर कपूर आणि विकी कौशल देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : अंबरनाथमध्ये चायनीजच्या दुकानातून घातक हत्यारं हस्तगत

Beed News: बीडमध्ये चाललंय काय? आश्रम शाळेत अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा छळ, नवऱ्याला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी -शिवाजीनगर मेट्रो 'या' दिवशी होणार सुरू, पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार

Sonam Wangchuk Hunger Strike : "खऱ्या रँचोसाठी आवाज उठवलाच पाहिजे...", बॉलिवूड अन् मराठी कलाकारांचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा | VIDEOS

Tech Tips : तुम्हाला माहित आहे का? फोनच्या कॅमेरा जवळ छोटे छिद्र का असते ?

SCROLL FOR NEXT