Vidya Balan : केसात गजरा अन् कपाळावर चंद्रकोर, विद्या बालनचा मराठमोळा अंदाज पाहिलात का? जबरदस्त डान्सनं वेधलं लक्ष

Vidya Balan Dance Video : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने सोशल मीडियावर एक हटके डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिचा मराठमोळा लूक पाहायला मिळत आहे.
Vidya Balan Dance Video
Vidya BalanSAAM TV
Published On

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan ) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. अलिकडेच ती 'भूल भुलैया 3' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. चित्रपटातील तिची भूमिका चाहत्यांना खूप आवडली होती. विद्या बालन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. वेगवेगळे मजेशीर रिल्स चाहत्यांसोबत ती शेअर करत असते.

विद्या बालनने नुकतीच एक मराठमोळी रिल चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ज्यात ती एका मराठमोळ्या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. तिने रिलसाठी लूक देखील खूपच हटके केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने मराठी गाणे 'खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली काल बाई सुपारी फुटली' (Navri Natali) यावर भन्नाट डान्स केला आहे. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

विद्या बालन हिच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. तिने डान्ससाठी खूप खास लूक केला आहे. तिने ऑरेंज रंगाची साडी नेसली आहे. मोठे कानातले, कपाळावर चंद्रकोर आणि केसाल गजरा घालून तिने हा लूक केला आहे. मिनिमल मेकअपमध्ये विद्या खूपच सुंदर दिसत आहे. गाण्यावरचे तिचे एक्स्प्रेशन्स पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या अदा पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत.

विद्या बालनने या हटके डान्स व्हिडीओला एक खास कॅप्शन दिले आहे. तिने लिहिलं की,"नवरी नटली...सुपारी फुटली" असे कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. विद्या बालनचे चाहते तिच्या आगामी चित्रपटासाठी उत्सुक आहेत.

Vidya Balan Dance Video
Chhaava Box Office Collection: 'छावा'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम, १६ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com