Aishwarya Rai SAAM TV
मनोरंजन बातम्या

Aishwarya Rai : लेकीच्या वाढदिवसाला बापाची गैरहजेरी? ऐश्वर्याने शेअर केले आराध्याच्या वाढदिवसाचे Unseen फोटो

Aaradhya Bachchan Birthday: नुकताच आराध्याचा १३ वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. त्याचे फोटो ऐश्वर्या रायने सोशल मिडिया शेअर केले आहेत.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगली चर्चेत आहे. सोशल मीडियावर सध्या ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच आता ऐश्वर्या आणि अभिषेकच्या मुलीचा म्हणजे आराध्या बच्चनचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आराध्याचा वाढदिवस 16 नोव्हेंबर 2024 रोजी होता. आता आराध्या (Aaradhya Bachchan) 13 वर्षांची झाली आहे.

आराध्या बच्चनच्या वाढदिवसाचे फोटो नुकतेच अभिनेत्री ऐश्वर्या रायने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोंमध्ये वडील अभिषेक बच्चनची अनुपस्थित पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या रायने शेअर केलल्या फोटोमध्ये आराध्या आपल्या आजीसोबत आणि आई ऐश्वर्यासोबत छान वेळ घालवताना पाहायला मिळत आहे. अभिषेकच्या अनुपस्थितीमुळे सोशल मीडियावर पुन्हा ऐश्वर्या-अभिषेक यांच्या नात्यावर चर्चा रंगल्या आहेत.

ऐश्वर्या रायने लेकीच्या वाढदिवसाचे फोटो शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एकीकडे आराध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा चाहते देत आहेत. तर दुसरीकडे लेकीच्या वाढदिवसाला अभिषेक बच्चनची अनुपस्थित प्रश्न करताना पाहायला मिळत आहेत. तसेच आराध्याच्या वाढदिवसाला बच्चन कुटुंब गैरहजर असल्याचे पाहायला मिळत आहे. फोटोंमध्ये आराध्या आपली आजी आणि आईसोबत आनंदात वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. तसेच ती आपल्या आजोबांच्या फोटोला नमस्कार करताना पाहायला मिळत आहे.

आराध्याच्या वाढदिवसाचे फोटो शेअर करताना ऐश्वर्याने खूप खास कॅप्शन दिल आहे. तिने लिहिलं की, "वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा... माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्ती, बाबा-अज्जा आणि माझी प्रिय आराध्या...माझे हृदय... माझा आत्मा... सदैव..." असे हटके आणि भावुक कॅप्शन ऐश्वर्याने लिहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

WhatsApp Security : व्हॉट्सअ‍ॅप कधीच होणार नाही हॅक, सायबर एक्सपरर्टने दिला भन्नाट सल्ला

Maharashtra Live News Update: राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

Lunar Eclipse: वर्षातलं दुसरं चंद्रग्रहण कधी? यावेळी कोणत्या गोष्टी कराव्या, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT