Rishabh Pant Car Accident SAAM TV
मनोरंजन बातम्या

Rishabh Pant: ऋषभच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींची हॉस्पिटलमध्ये रिघ...

अनुपम खेर आणि अनिल कपूर यांनी रुग्णालयात जाऊन ऋषभच्या प्रकृतीची चौकशी केली आहे.

Pooja Dange

Anupam Kher-Anil Kapoor Meet Rishabh Pant: भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतचा काल भीषण अपघात झाला आहे. ऋषभाला गंभीर दुखापत झाली आहे. ऋषभच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. अनेक सेलिब्रिटी तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. तर काही सेलिब्रिटींनी त्याची थेट भेट घेतली आहे. अनुपम खेर आणि अनिल कपूर यांनी रुग्णालयात जाऊन ऋषभच्या प्रकृतीची चौकशी केली आहे.

बॉलिवूड स्टार अनुपम खेर आणि अनिल कपूर यांना जेव्हा ऋषभच्या अपघाताविषयी समजले तेव्हा दोघेही त्याला भेटण्यासाठी थेट रुग्णालयात गेले. ऋषभ पाहिल्यानंतर अनुपम म्हणाले की, 'ऋषभ रुग्णालयामध्ये असल्याचं कळताच आम्ही त्याला भेटायला गेलो. त्याच्या आईची भेट घेतली. आता तो आधीपेक्षा बरा आहे. सर्व भारतीयांच्या प्रार्थना त्याच्या पाठीशी आहेत. तो लवकरच बरा होईल. तो एक फायटर आहे.' (Rishabh Pant)

अनिल कपूरनेही ऋषभ पंतच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे, 'ऋषभ आता ठीक आहे. आम्हाला जी काळजी वाटत होती, ती आता अजिबात नाही. आम्ही त्याला थोडे हसवण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्याला बॉलिवूड स्टार नाहीत तर मित्र म्हणून भेटायला गेलो होतो.' अनुपम खेर यांनी सांगितले की, 'मला वाटतं की कोणालाही अशा वेळी भेटायला जावं जेव्हा त्यांची सगळ्यांना गरज असते. हॉस्पिटलचे प्रोटोकॉल पाळून आम्ही ऋषभची भेट घेतली.' (Actor)

ऋषभ पंतला भेटल्यानंतर आणि त्याच्या प्रकृतीची माहिती घेतल्यानंतर अनुपम खेर आणि अनिल कपूरआनंदी दिसत होते. त्यांनी सांगितले की, आमचा भारतीय क्रिकेटर लवकरच बरा होईल. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी ऋषभ पंत त्याच्या आईला सरप्राईज देण्यासाठी रुडकीला जात होता. त्याच्या गावी जात असताना ऋषभ पंत स्वत: कार चालवत होता. कारच्या वेगामुळे त्याचा अपघात झाला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एकाच मतदाराचं 103 वेळा नाव

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT