Vivek Oberoi  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Vivek Oberoi : चित्रपट सुपरफ्लॉप ठरले, तरीही झाला तब्बल 1200 कोटी संपत्तीचा मालक, बॉलिवूडच्या 'माया भाई'ची एवढी संपत्ती कशी?

Vivek Oberoi Net Worth : बॉलिवूडचा 'माया भाई' म्हणजे विवेक ओबेरॉयने अनेक फ्लॉप चित्रपट केले आहेत. तरी देखील त्याने कोटींची मालमत्ता उभारली आहे.

Shreya Maskar

बॉलिवूडचा सुपरफ्लॉप म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सध्या त्याच्या लग्झरी लाइफस्टाइलमुळे चर्चेत आहे. नुकतीच त्याने रोल्स रॉयस कलिनन ही आलिशान कार खरेदी केली आहे. ज्याची किंमत तब्बल 12 कोटी रुपये आहे. तर दिवाळीच्या मुहूर्तावर या अभिनेत्याने अलिशान घर देखील खरेदी केले आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi ) आहे.

विवेक ओबेरॉयला बॉलिवूडचा 'माया भाई' म्हणून ओळखले जाते. त्यांनी आजवर अनेक फ्लॉप चित्रपट केले आहेत. तसेच एकेकाळी तो बॉलिवूडमधून बॉयकॉट देखील झाला होता. मात्र तरी देखील आज त्याची कोटींची संपत्ती (Vivek Oberoi Net Worth) आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, विवेक ओबेरॉयची मालमत्ता तब्बल 1200 कोटी रुपये आहे. त्याने व्यवसायात गुंतवणूक करून एवढे साम्राज्य उभारले आहे. कर्मा इन्फ्रास्ट्रक्चर रिअल इस्टेट आणि मेगा एंटरटेनमेंट इव्हेंट मॅनेजमेंट या दोन कंपनींमधून त्याला जास्त पैसा मिळतो. विवेक ओबेरॉय आता एका चित्रपटासाठी 3 ते 4 कोटींचं मानधन घेतो. विवेक अल मरजान आइलँड, Aqua Arch प्रोजेक्टचा फाउंडर आहे. हा प्रोजेक्ट 2,300 कोटींचा आहे. तर स्वर्णिम विश्वविद्यालयाचा तो को-फाउंडर आहे. तसेच त्याने अनेक स्टार्टअप्समध्ये देखील गुंतवणूक केली आहे. विवेकच्या एकूण संपत्तीच्या पुढे मोठे स्टार देखील कमी आहेत.

विवेक ओबेरॉयने 'कंपनी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'कंपनी' चित्रपट 2002 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. यानंतर त्याने साथिया, मस्ती, ओमकारा असे अनेक हिट चित्रपट दिले. तसेच त्यांनी अनेक वेब सीरिजमध्ये देखील काम केले आहे.

विवेकचे त्याच्या ऐश्वर्यासोबतच्या नात्यामुळे सलमान खानसोबत देखील मोठा वाद झाला. मात्र त्यानंतर त्याचे चित्रपट चालले नाही आणि काही काळासाठी तो इंडस्ट्रीमधून गायब झाला. तरी विवेक ओबेरॉय तब्बल 1200 कोटी संपत्तीचा मालक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT