Vidyut Jamwal First Reaction On Breaking Engagement Saam tv
मनोरंजन बातम्या

Vidyut Jamwal Engagement: 'खूपच सुंदर होता तो क्षण...', साखरपुडा मोडल्याने इमोशनल झाला विद्युत जामवाल

Vidyut Jamwal First Reaction On Breaking Engagement: विद्युत जामवालने नंदिता महतानीसोबतचा साखरपुडा तुटल्यावर पहिली प्रतिक्रिया दिली असून हे सांगताना तो खूपच इमोशनल झाला.

Priya More

Vidyut Jamwal On Breaking Engagement:

बॉलिवूड (Bollywood) 'कमांडो' अर्थात अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jamwal) सध्या चर्चेत आला आहे. तो चर्चेत येण्यामागचे कारण म्हणजे त्याचा चित्रपट अथवा त्याचा स्टंटचा व्हिडीओ नाही. तर विद्युत जामवाल चर्चेत आला यामागचे कारण म्हणजे त्याना साखरपुडा तुटल्याच्या चर्चांवर मौन सोडले आहे. विद्युतने साखरपुडा (Vidyut Jamwal Engagement) तुटल्यावर पहिली प्रतिक्रिया दिली असून हे सांगताना तो खूपच इमोशनल झाला.

विद्युतचा साखरपुडा तुटला -

विद्युत जामवालने दोन वर्षांपूर्वी फॅशन डिझायनर नंदिता महतानीसोबत साखरपुडा केला होता. नंदिता आणि विद्युत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत साखपुडा केल्याची माहिती दिली होती. विद्युतने ताजमहलसमोर नंदिताला अंगठी घातल्याचा फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत नात्याची कबुली दिली होती. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

उघडपणे बोलला विद्युत जामवाल -

पण विद्युत आणि नंदिताचे नाते फार काळ टिकले नाही. त्यांचा ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. एका लग्नात दोघेही एकमेकांपासून अंतर राखताना दिसले होते. पण विद्युत आणि नंदिताचा ब्रेकअप झाल्यावर चाहत्यांना विश्वास बसत नव्हता. आता विद्युत स्वत:च यावर उघडपणे बोलला आहे.

आमच्यावर खूप सामाजिक दबाव होता -

एका मुलाखतीत विद्युतने ब्रेकअपबद्दलची माहिती दिली. त्याने सांगितले की, 'मी प्रेमात पडलो आणि माझा साखरपुडा झाला. खूप सुंदर क्षण होता तो. मग मी आणि नंदिताने ठरवलं की थोडं थांबून लग्नाचा विचार करूया. आमच्यावर खूप सामाजिक दबाव होता. आता आम्ही या नात्यात थोडे हळू-हळू पुढे जात आहोत.' विद्युतला डेटिंग आणि प्रेमाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने हे उत्तर दिले.

नात्यात आनंदी राहाणे महत्वाचे -

ब्रेकअपबद्दल बोलताना विद्युत इमोशनल झाला. विद्युतने पुढे सांगितले की, 'मी माझ्या आयुष्यात अनेक टप्पे पार केले आहेत. माझ्यासाठी डेटिंग खूप मजेशीर नाही. मला प्रेमात पडणे आवडले. प्रेमात पडण्याची प्रक्रिया अशी आहे की तुम्हाला ती व्यक्ती आवडली पाहिजे. जर ती व्यक्ती तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करू शकता. कोणत्याही नात्यात आनंदी राहणे महत्त्वाचे असते.'

मोना सिंगला केलंय डेट -

दरम्यान, विद्युत जामवालने नंदिता महतानीच्या आधी मोना सिंगला डेट केले होते. परंतु लवकरच दोघेही वेगळे झाले. विद्युतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, विद्युतचा रिव्हेंज अॅक्शन चित्रपट 'खुदा हाफिज चॅप्टर 2' नुकताच प्रदर्शित झाला. अभिनेता लवकरच एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT