sonu sood
sonu sood Saam Tv
मनोरंजन बातम्या

...तर लाऊडस्पीकरवर माणुसकीचा आवाज येईल; भोंग्याच्या वादावर सोनू सूदचं वक्तव्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मिशिंदीवरील भोंगे (Mosque issue) उतरवण्यावण्याच्या वादावरुन राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंगे उतरवण्याबाबत आक्रमक भूमिक घेतल्याने राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांचा आवाजही दणाणून गेला आहे.भोंग्याच्या मुद्द्यावरुन जातीय तेढ निर्माण होत असल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेते सोनू सूदने (sonu sood) प्रतिक्रिया दिली आहे. "भोंग्यांचा वाद खूप दु:खद आहे. धर्म, जातीतून बाहेर पडल्यानंतर माणुसकीची चर्चा कराल तेव्हा लाऊडस्पीकरवर अजान किंवा चालीसेचा आवाज येणार नाही, तर लाऊडस्पीकरवर माणुसकीचा आवाज येईल." असं वक्तव्य सोनू सूदने केलं आहे.

दरम्यान, माध्यमांशी बोलताना सोनू म्हणाला, लोकांच्या आशिर्वादामुळं मी इथपर्यंत पोहोचलो आहे. मला आणखी फार पुढं जायचं आहे.भोंग्याचा वाद खूप दु:खद आहे. जेव्हा लोकं कोरोना काळात अडचणीत होती.जेव्हा ॲाक्सिजनची गरज होती तेव्हा जात धर्म पाहीला नाह.तेव्हा आपण देशाला जोडले गेलो.त्यावेळी घट्ट नातं होतं.आता धर्म-जात यातून बाहेर पडून काम करण्याची तिच वेळ आहे.तसंच जितो कार्यक्रमाबद्दल बोलताना सोनू म्हणाला, मी यापूर्वी जितो कार्यक्रमात आलो होतो.हा कार्यक्रम चांगला असतो. जितो कार्यक्रमातकमालीचे काम होते.

मला वाटतं देशाची प्रगती तेव्हाच होईल जेव्हा आपण धर्म आणि जात यापासून बाहेर निघू. जी ताकद हनुमान चालीसामध्ये आहे, तीच ताकद नमाजमध्ये आहे. देश एकत्र येणे हे जास्त महत्वाचे आहे. धर्म हा लोकांनी बनवला आहे. आपण यापासून बाहेर पडलं पाहिजे. देशात अनेक मोठे मोठे मुद्दे आहेत. राजकारणाने जनतेचे प्रश्न सोडवावे. आपण जर यातच अडकून राहील तर सामान्य लोकांच्या अडचणी कधीही संपणार नाहीत. पहिल्यांदा हे कस संपवायचं हे पहिले पाहिजे बाकीच्या गोष्टी महत्वाच्या नाहीत. असंही सोनू सूदनं म्हटलं होतं.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Voting LIVE: राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात थोड्यात वेळात मतदानाला सुरुवात

Lok Sabha Election 2024: बारामतीसह ११ लोकसभा मतदारसंघात आज होणार मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Horoscope Today: व्यवहारात सतर्कता बाळगा, सावधगिरीने काम करा; जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: मंगळवार तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? वाचा राशिभविष्य

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

SCROLL FOR NEXT