Gashmir Mahajani And Siddharth Malhotra  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jhalak Dikhala Ja: गश्मिरसोबत सिद्धार्थने मराठी गाण्यावर धरला ठेका; डान्स पाहून परिक्षकांच्या खास प्रतिक्रिया

गश्मिरचा डान्स पाहून सिद्धार्थलाही त्याच्यासोबत डान्स करण्यावाचून राहावले नाही. त्या दोघांनीही सैराट चित्रपटातील गाजलेल्या 'झिंगाट' गाण्यावर थिरकले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: यंदाच्या 'झलक दिखला जा' (Bollywood) या सीझनमध्ये चंद्रमुखी फेम अमृता खानविलकर (Marathi Actress) आणि झी मराठीवरील 'डान्स महाराष्ट्र डान्स' या कार्यक्रमात परिक्षकाची भूमिका साकारणारा गश्मिर महाजनी (Marathi Actors) स्पर्धक म्हणून या कार्यक्रमात सहभागी झाला आहे. 'झलक दिखला जा' कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक आठवड्यात कार्यक्रमातील हटक्या थीममुळे यंदाच्या पर्वाची चांगलीच चर्चा रंगत आहे. या कार्यक्रमाला नुकताच बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने (Bollywood Actor) हजेरी लावली होती. या आठवड्यातील कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

गश्मिरने सिद्धार्थला मराठी चित्रपटातील काही खास गाजलेल्या गाण्यांवर ठेका धरायला लावला. सिद्धार्थच्या डान्सने चाहते भारावून गेले आहेत. या भागात गश्मिरने फॅंड्री चित्रपटातील 'तुझ्या प्रितीचा हा विंचू मला चावला' या गाण्यावर डान्स सादर केला आहे. गश्मिर अभिनयक्षेत्रासोबतच नृत्यातही निपुण आहे. त्याची खास डान्स शैली पाहून सिद्धार्थही भारावून गेला आहे. सिद्धार्थने गश्मिरचे कौतूक केले आहे. सिद्धार्थ म्हणतो, “गश्मीर ब्रो. तू खूप उत्तम डान्सर आहेस.”

गश्मिरचा डान्स पाहून सिद्धार्थलाही त्याच्यासोबत डान्स करण्यावाचून राहावले नाही. त्या दोघांनीही सैराट चित्रपटातील गाजलेल्या 'झिंगाट' गाण्यावर थिरकले. डान्समधील काही खास स्टेप्स करत साऱ्यांचेच लक्ष स्वत:कडे वेधून घेतले. या दोघांचाही परफॉर्म पाहून बॉलिवूड निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने 'झिंगाट परफॉर्मन्स' अशी प्रतिक्रिया दिली.

गश्मिरने मराठी चित्रपटसृष्टीसोबत बॉलिवूडमध्येही आपली छाप सोडली आहे. त्याने सरसेनापती हंबीरराव, देऊळ बंद, कॅरी ऑन मराठा, डोंगरी का राजा आणि याहून अधिक चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : तुला घरी नेण्यासाठी कुणी आलं नाही का? पाचवीतल्या चिमुकलीसोबत शिक्षकाचं किळसवाणं कृत्य, रत्नागिरीत खळबळ

Raj Thackeray : माझ्या परवानगीशिवाय कोणाशी बोलू नका, राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांना आदेश

Pune News : चिमुरडीचा जीव वाचवणारा, फायर ब्रिगेडचा हिरो

Morning Weight loss Drink: रिकाम्या पोटी प्या 'हे' मॉर्निंग सुपरड्रिंक, वजन होईल कमी

मीरारोडला गर्जला मराठी; दिवसभरात नेमकं काय घडलं? मराठीचा एल्गार, मोर्चापूर्वी काय घडलं?

SCROLL FOR NEXT