Famous Actor SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्यावर तब्बल 6 तासांची शस्त्रक्रिया, उठणं-बसणंही झालेलं कठीण

Bollywood Actor Undergoes Surgery : बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्यावर शस्त्रक्रिया झाली. अभिनेत्याचे हॉस्पिटलमधील फोटो समोर आले आहेत. अभिनेत्याला नेमकं झालं काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्याची बिघडली होती प्रकृती

अभिनेत्यावर झाली मोठी शस्त्रक्रिया

अभिनेते हॉस्पिटलमध्ये होते दाखल

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते हॉस्पिटलमध्ये दाखल होते आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते शरत सक्सेना (Sharat Saxena) यांच्या पाठीच्या कण्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अभिनेत्याने पोस्ट शेअर करून आपले हेल्थ अपडेट दिले आहे.

शरत सक्सेना यांनी आपली हेल्थ अपडेट देताना दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये अभिनेते spine शस्त्रक्रिया करण्यापूर्वी उभे राहून एमआरआय काढताना दिसत आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये शस्त्रक्रिया केल्यानंतरचे हेल्थ अपडेट देताना दिसत आहे. शस्त्रक्रियेनंतर अभिनेते उत्साही दिसत आहेत. तब्बल सहा तास शस्त्रक्रिया चालली. त्यांनी हॉस्पिटलमधील फोटो शेअर करून पोस्टला लिहिलं की, "६ तासांची स्पाइन सर्जरी (पाठीच्या कण्यावरील शस्त्रक्रिया) पूर्ण झाली. एका खंबीर माणसाला कोणीही हरवू शकत नाही (CAN'T KEEP A GOOD MAN DOWN)."

पोस्टमध्ये रुग्णालयातील उपचारादरम्यानचे आणि त्यानंतर रुग्णालयातून घरी परततानाचे अनेक फोटो होते. एका फोटोमध्ये शस्त्रक्रियेनंतर ते अंथरुणावर विश्रांती घेताना आणि कुटुंब, मित्रपरिवारासोबत हसताना दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये ते आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत गाडीतून घरी जाताना दिसत आहेत. अभिनेते शरत सक्सेना शस्त्रक्रियेनंतर अगदी ठीक झाले आहेत.

अभिनेत्याने फोटोंना मजेशीर कॅप्शन देत हेल्थ अपडेट दिले आहे. एका छोट्याशा सेलिब्रेशनच्या फोटोवर "आज पार्टी, उद्या जिम" (PARTY TODAY GYM TOMORROW) असे लिहिले होते, तर रुग्णालयातील खोलीतील दुसऱ्या एका फोटोवर "आता आणखी सूप नको!" (NO MORE SOUP!!!) असा संदेश होता. आणखी एका फोटोवर "आता चालण्याची काठी नको!" (NO MORE WALKING STICK!!!) असे लिहिले होते, ज्यातून ते लवकर बरे होत असल्याचे दिसून येत आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळी कमेंट्स करून तब्येतीची विचारपूस करत आहेत. तसेच त्यांना लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

शरत सक्सेना करिअर

शरत सक्सेना यांची कारकीर्द ५० वर्षांहून अधिक काळाची असून त्यांनी हिंदी आणि प्रादेशिक अशा विविध भाषांमधील २५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'मिस्टर इंडिया', 'त्रिदेव', 'घायल', 'खिलाडी', 'गुलाम', 'गुप्त: द हिडन ट्रुथ', 'फिर हेरा फेरी', 'बागबान', 'फना', 'सन ऑफ सरदार २' 'क्रिश' आणि 'बजरंगी भाईजान' यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांसाठी ते विशेष ओळखले जातात. त्यांच्या खलनायकाच्या भूमिका खूप गाजल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India : १२ हजार फूट उंचीवर तलाव अन् काठावर अनोखं गाव, डोळ्यांचं पारणं फेडणारे सौंदर्य

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

DA Hike 2026: केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवरात्रीपूर्वी मोठी भेट? DA मध्ये 4% वाढीची शक्यता

Ratnakar Mahajan Passes Away : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

मोठी बातमी: मनोज जरांगे आज मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर करणार, बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष

SCROLL FOR NEXT