Shaheed Kapoor Limited Interaction With Father Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shaheed Kapoor And Father Relation: ‘मी आईशी एकनिष्ठ आहे...’ शाहिदने सांगितले वडिलांची खरी ओळख लपवण्याचे कारण

Chetan Bodke

Shaheed Kapoor Limited Interaction With Father: बॉलिवूडचा हँडसम हंक अभिनेता गेल्या काही दिवसांपूर्वी ‘फर्जी’ वेबसीरिजमुळे आणि ‘ब्लडी डॅडी’ चित्रपटामुळे शाहिद कपूर कमालीच चर्चेत आला आहे. नेहमीच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या शाहिद कपूरने आपल्या वडिलांसोबतचा एक किस्सा शेअर केला आहे. त्याने नुकतंच दिलेल्या मुलाखतीत वडिलांसोबत कोणत्या कारणामुळे संवाद नाकारला. यावर भाष्य केलं आहे.

अभिनेता शाहिद कपूरने जेव्हा बॉलिवूडमध्ये डेब्यू केले त्यावेळी त्याने अभिनेता पंकज कपूरचा मुलगा असल्याबद्दल इंडस्ट्रीतील कोणालाही सांगितले नाही. शाहिदने आई नीलिमा अझीमला दिलेलं वचन पाळायचं होतं. नऊ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर माझ्या आई वडिलांनी (पंकज कपूर आणि नीलिमा अझीम) १९८४ मध्ये घटस्फोट घेतला. आई- वडिलांचा दोघांचाही घटस्फोट झाल्यानंतर अभिनेता शाहिद कपूर त्याच्या आईसोबत राहत होता.

अभिनेता मुलाखतीत म्हणतो, ‘आईचा आणि वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर मी माझ्या आईसोबत राहायचो. मी तिच्याशी नेहमीच एकनिष्ठ राहायचो. मला माहित होतं की, ते माझे वडील आहेत आणि आमच्या दोघांमधील नाते देखील खूप चांगले आहे. पण मी माझ्या आईला सांगितले की, मला माझे करिअर स्वतः बनवायचे आहे. मला कोणालाही वडिलांबद्दल सांगायचे नाही. माझे वडील माझ्यासाठी खूपच खास व्यक्ती होती. ते एक गंभीर अभिनेता असून ते कॉमेडी करतानाही त्यांच्या अभिनयाला देखील खूप गांभीर्य असायचं.’

सोबतच मुलाखतीतल्या एका भागात अभिनेत्याने सांगितले की, ‘मी आणि माझी आई मुंबईला गेल्यावर माझी आणि वडिलांची भेट झाली होती. माझे वडिल दिल्लीत कधीच येत नव्हते. मी १० वर्षाचा होईपर्यंत माझी भेट आणि वडिलांची भेट सहसा कधी होतच नव्हती.’ असं अभिनेत्याने सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT