Trial Period Movie Trailer : मुलाच्या हट्टापोटी चक्क ट्रायल बाबा... जिनिलियाच्या 'ट्रायल पिरीयड'चा कॉमेडी ट्रेलर प्रदर्शित

Genelia Deshmukh Movie : जिनिलियाचा 'ट्रायल पिरीयड' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
Trial Period Movie Trailer
Trial Period Movie TrailerSaam TV

Genelia Deshmukh Movie Trial Period Trailer Out : जिनिलिया देशमुखच्या 'वेड' चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. जिनिलिया आता नवीन चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुलासाठी ३० दिवस ट्रायल पिरीयडवर बाबा आणणारी ही आई काय नवीन धमाल आणते हे पाहणं रंजक ठरणार आहे. जिनिलियाचा 'ट्रायल पिरीयड' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

जर तुम्हच्या आयुष्यात ट्रायल पिरीयडवर बाबा आले तर कसं वाटेल. अशाच आशयाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजकाल कोणतीही गोष्ट ट्रायलसाठी मिळते. तसेच जर बाबा पण ट्रायल पिरीयडवर मिळाले आहेत. स्वतः च्या मुलीच्या हट्टापोटी आईने चक्क बापालाच ट्रायलसाठी आणलंय,असं या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. (Latest Entertainment News)

Trial Period Movie Trailer
Chanakya Poster : महाराष्ट्राचे खरे चाणक्य शरद पवारसाहेब... निर्मात्यांनी चित्रपटाचा पोस्टर शेअर करत दिला पाठिंबा

'ट्रायल पिरीयड' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवली आहे. ट्रेलरमध्ये एक लहान मुलगा टीव्हीवर कोणतीही गोष्ट ट्रायलसाठी उपलब्ध अशी जाहिरात पाहतो.

त्यानंतर मुलगा आईकडे बाबा ट्रायलसाठी आणावा असा हट्ट करतो. त्याची आई त्याचा हा हट्ट पुरवते. अशी अनोखी कहाणी असलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वेडसारख्या चित्रपटानंतर जिनिलिया ट्रायल पिरीयड या कॉमेडी चित्रपटामध्ये दिसणार आहे.

जिनिलियाने एका मुलाखतीत चित्रपटाबद्दल माहिती दिली. 'मी आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे की जिथे मी चित्रपटाच्या संख्येपेक्षा चित्रपटाचा दर्जा पाहते. जेव्हा मला या चित्रपटासाठी विचारण्यात आले. तेव्हा ही कथा आई-बापावर आधारित आहे हे समजले.

एका सिंगल मदरला तिचे प्रेम मिळते अशी कथा आहे. जी सामान्य कथेपेक्षा खूप वेगळी आहे.प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्यात अनेक संकटाचा सामना करावा लागतो.त्यामुळे एका स्त्रीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचा मी भाग झाले. या चित्रपटासाठी मी खूप उत्सुक आहे'. असे जिनिलिया म्हणाली.

चित्रपटात जिनिलिया आणि मानव कौल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जिनिलिया ही सिंगल मदरची भूमिका साकारत आहे तर मानव कौल हा ट्रायल बाबा म्हणून चित्रपटात दिसणार आहे.तर चित्रपटात शक्ती कपूर, शीबी चड्डा,गजराजराव अशी कास्ट दिसणार आहे. हा चित्रपट २१ जुलैला जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com