Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Box Office Collection  Saam Tv
मनोरंजन बातम्या

शाहिद- क्रितीच्या 'Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya' ला विकेंडचा जबरदस्त फायदा, तिसऱ्या दिवशीही केली इतकी कमाई?

TBMAUJ 3rd Day Collection: रिलीजच्या तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाच्या कमाईमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला विकेंडचा खूप चांगला फायदा झाला.

Priya More

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि क्रिती सेनॉन (Kriti Senon) यांच्या 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Movie) या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे. ९ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जादू पाहायला मिळत आहे. रिलीजच्या तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाच्या कमाईमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला विकेंडचा खूप चांगला फायदा झाला. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये मोठी गर्दी केली होती. या चित्रपटाने ३ दिवसांमध्येच भरघोस कमाई केली आहे.

शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनच्या या चित्रपटाला समिक्षणामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी प्रेक्षकांकडून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या व्हॅलेंटाईन वीकचा चित्रपटाला प्रचंड फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. शाहिद आणि क्रितीची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवसापासूनच चांगली सुरूवात केली. शाहिद आणि क्रितीच्या केमिस्ट्रीला पसंती मिळत आहे. या चित्रपटाने रिलजीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 10.5 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 6.7 कोटींची आणि दुसऱ्या दिवशी 9.65 कोटींची कमाई केली होती. अशापद्धतीने या चित्रपटाने तीन दिवसांमध्ये एकूण 26.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

या चित्रपटाच्या वर्ल्डवाइड कलेक्शनबद्दल सांगायचे झाले तर, या चित्रपटाने जगभरामध्ये पहिल्याच दिवशी 14 कोटींची कमाई केली होती. तर पुढच्या दोन दिवसांमध्ये देखील चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशी वर्ल्डवाइड कलेक्शनमध्ये वाढ झाली असून ही कमाई 32.5 कोटींवर पोहचली आहे. अशामध्ये शाहिद आणि क्रितीसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण त्यांचे आधीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकले नाहीत.

दरम्यान, मॅडॉक फिल्मने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना साह यांनी केले आहे. या चित्रपटात शाहीद कपूर आणि क्रिती सेनॉनसोबत धर्मेंद्र आणि डिंपल कपाडियासारखे कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटामध्ये शाहिद कपूर लव्हर बॉयच्या भूमिकेत आहे. तर क्रिती सेनॉन रोबोटच्या भूमिकेत आहे. या चित्रपटातील डायलॉगसोबतच गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT