संजय मिश्रा यांनी मढ आयलंडमध्ये लग्जरी अपार्टमेंट खरेदी केले.
नवीन घराची किंमत कोटींमध्ये आहे.
संजय मिश्रा यांचा 'हीर एक्सप्रेस' चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे.
बॉलिवूडमधून आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते संजय मिश्रा (Sanjay Mishra) यांनी आलिशान घर खरेदी केले आहे. एकीकडे कलाकार नवीन घरी खरेदी करत आहेत. तर दुसरीकडे काही सेलिब्रिटी आपली प्रॉपर्टी विकताना दिसत आहेत. संजय मिश्रा यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, संजय मिश्रा यांचे नवे घर मढ आयलंडमध्ये आहे. त्यांनी हे लग्जरी अपार्टमेंट तब्बल 4.75 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. अपार्टमेंटमध्ये 1,701चौरस फूटचा कार्पेट एरिया आणि 201 चौरस फूटचा अतिरिक्त डेक एरिया आहे, ज्यामुळे त्याचे एकूण रेरा कार्पेट एरिया 1,900 चौरस फूटांपेक्षा जास्त आहे. मढ आयलंड हे सेलिब्रिटींसाठी वेगाने लोकप्रिय ठिकाण बनत आहे. येथे चित्रपट आणि टीव्ही स्टुडिओच्या जवळ आहे. ज्यामुळे कलाकारांना चित्रीकरणाच्या ठिकाणी पोहोचणे सोपे होते.
कागदपत्रांवरून असे समजून येते की, 28.50 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि 30,000 रुपयांची नोंदणी रक्कम भरली आहे. हा व्यवहार 11 जुलै 2025 रोजी नोंदणीकृत झाला. संजय मिश्रा यांचे अपार्टमेंट मढआयलंडमधील रहेजा एक्झोटिका सायप्रस इमारतीच्या 15व्या मजल्यावर आहे. संजय मिश्रा यांचे मढ आयलंडमध्ये समुद्रकिनारी आलिशान घर आहे. हे ठिकाण मालाड आणि अंधेरी सारख्या प्रमुख भागांशी जोडते. येथे अनेक इतर सेलिब्रिटींची घरे देखील आहेत.
संजय मिश्रा अलिकडेच अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार 2' मध्ये दिसले आहेत. संजय मिश्रा यांनी आपल्या कॉमेडीने संपूर्ण जगाला खूप हसवले आहे. 12 सप्टेंबरला त्यांचा 'हीर एक्सप्रेस' चित्रपट रिलीज झाला आहे. चाहते त्यांच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.