Sanjay Dutt and Arshad Warsi Upcoming Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sanjay Dutt-Arshad Warsi Movie: मुन्नाभाई आणि सर्किट पुन्हा दिसणार मोठ्या पडद्यावर, चित्रपटाचे नाव मात्र गुलदस्त्यात

सर्किट आणि मुन्नाभाईची यांची जोडी पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Pooja Dange

Sanjay Dutt-Arshad Warsi Upcoming Movie: बॉलिवूडचा 'मुन्नाभाई एमबीबीएस' हा चित्रपट तसेच प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्यानंतर त्याचे सिक्वेल देखील चित्रपटप्रेमींनी आवर्जून पहिले होते. या चित्रपटामधील मुन्नाभाई आणि सर्किटची जोडी चांगलीच गाजली. 'मुन्नाभाई एमबीबीएस' आणि 'लगे रहो मुन्नाभाई' या चित्रपटांमध्ये संजय दत्त आणि अरशद वारसी यांनी उत्कृष्ट भूमिका साकारल्या होत्या. दोन्ही चित्रपट सुपरहिट झाले.

एकदा सर्किट आणि मुन्नाभाईची यांची जोडी पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. अलीकडेच अरशद वारसीने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे माहिती दिली आहे की, तो लवकरच संजय दत्तसोबत कमबॅक करत आहे.

अरशद वारसीने त्याच्या ट्विटर हँडलवर ट्विट केले करत लिहिले आहे की, मी माझा भाऊ संजय दत्तसोबत आणखी एक सुपर एंटरटेनिंग चित्रपट घेऊन परतलो आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, आम्ही तुमच्यापेक्षा जास्त या चित्रपटाची वाट पाहत आहोत.

अरशद वारसाने या ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये सिद्धांत सचदेव, गौरव दुबे आणि थ्री डायमेंशन मोशन पिक्चर्सला टॅग केले आहे. परंतु त्याने अद्याप चित्रपटाचे नाव सांगितले नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धांत सचदेव करत असून हा चित्रपट यावर्षी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

अरशद वारसीची कॉमेडी चाहत्यांना खूप आवडते. चित्रपटातील गंभीर भूमिका असो किंवा कॉमेडी, प्रत्येक भूमिका कशी वठवायची हे अरशद चांगलेच ठाऊक आहे. संजय दत्तसोबतची त्याची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते.

2006 मध्ये आलेल्या 'लगे रहो मुन्नाभाई' या चित्रपटात दोघांनी शेवटचे एकत्र काम केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत विद्या बालनही मुख्य भूमिकेत होती. आता पुन्हा एकदा अरशद वारसी आणि संजय दत्तची जोडी पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Saturday Remedies: शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनिवारी करा 'हे' ३ सोपे उपाय; घरातील कटकटी होतील कायमच्या दूर!

Rajdhani Express Accident : राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, इंजिन अन् ५ डब्बे रूळावरून घसरले

Mumbai Crime: मुंबई हादरली! कोल्डड्रिंकमधून गुंगीचं औषध दिलं, अल्पवयीन मुलींवर बलात्कार; अश्लिल व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल

Kitchen Hacks : सोफा कुशनवर डाग लागल्यास काय करावे? जाणून घ्या योग्य टिप्स

SCROLL FOR NEXT