Bigg Boss 17 Promo Saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17 Promo: 'बिग बॉसचा वेगळा रंग पाहून व्हाल दंग', 'बिग बॉस १७'चा प्रोमो आऊट

Bigg Boss 17 first promo out: हा प्रोमो (Bigg Boss 17 Promo) पाहून यंदाचा बिग बॉस १७ खूपच खास असणार असल्याचे दिसत आहे.

Priya More

Bigg Boss Season 17:

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच प्रसिद्ध रियालिटी शो 'बिग बॉस'च्या १७ व्या सीझनची (Bigg Boss 17 ) चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. बिग बॉसच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. 'बिग बॉस १७' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोची घोषणा झाली असून आता प्रोमो देखील प्रदर्शित झाला आहे. हा प्रोमो (Bigg Boss 17 Promo) पाहून यंदाचा 'बिग बॉस १७' खूपच खास असणार असल्याचे दिसत आहे.

'बिग बॉस १७' च्या माध्यमातून अभिनेता सलमान खान देखील टीव्हीवर पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. नुकताच या मोस्ट अवेटेड शोचा पहिला प्रोमो व्हिडीओ प्रदर्शित झाला. ज्यामध्ये सलमान खानची खास झलक पाहायला मिळत आहे. या प्रोमोमुळे या शोची उत्सुकता द्विगुणित झाली आहे. बीग बॉसचा १७ वा सीझनही सलमान खान होस्ट करताना दिसणार आहे. नेहमीप्रमाणे या सीझनच्या प्रोमोमध्ये सलमान खान त्याच्या दमदार स्टाईलमध्ये दिसत आहे. या प्रोमो व्हिडिओमध्ये सलमान खानचे एक नाही तर तीन अवतार पाहायला मिळत आहेत.

'बिग बॉस १७' च्या या प्रोमो व्हिडिओमध्ये सलमान खान कधी सूट, कधी शेरवानी तर कधी टी-शर्टसह बुलेटप्रूफ जॅकेट घातलेला दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान म्हणतो आहे की, 'आतापर्यंत तुम्ही फक्त बिग बॉसचे डोळे पाहिले आहेत. आता तुम्हाला बिग बॉसचे तीन अवतार पाहायला मिळतील. हृदय, मन आणि श्वास आतापुरते मी एवढेच सांगू शकतो.'

कलर टीव्हीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा प्रोमो व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन मध्ये असे लिहिले आहे की, 'यावेळी बिग बॉस दाखवणार एक वेगळाच रंग. जे पाहून तुम्ही सर्वजण व्हाल दंग. 'बिग बॉस १७' लवकरच पाहा फक्त कलर्सवर...' कलर टीव्हीने शोचा प्रोमो शेअर केला आहे. पण त्यांनी शोच्या प्रसारणाची तारीख मात्र जाहीर केली नाही. पण असा अंदाज आहे की हा शो १५ ऑक्टोबरपासून प्रसारित केला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची मोठी गर्दी, बँकेबाहेर दिसल्या भल्यामोठ्या रांगा

Nandurbar : चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; नेसू नदीवर पूल नसल्याने पुरातून काढावा लागतो मार्ग

Maharashtra Live News Update : मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांची नोटीस

Political News : मराठी माणसांना भडकावून मते मिळवणे हाच ठाकरेंचा उद्देश; शिंदे गटाची आगपाखड

Sharad Pawar: महाराष्ट्रात शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचे राज्य पुन्हा उभे करावे लागेल- शरद पवार|VIDEO

SCROLL FOR NEXT