Shahrukh And Salman  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman vs Shahrukh: भारत-पाकिस्तान सामन्यादिवशी सलमान-शाहरुख आमने-सामने

भारत पाकिस्तान मॅच दरम्यान शाहरुख आणि सलमान यांचा सामना होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूडचा (Bollywood) बादशाह शाहरुख आणि भाईजान सलमान खान (Shahrukh Khan Salman Khan) यांचा आमना-सामना होणार आहे. शाहरुखचा चित्रपट (Movie) 'पठाण' आणि सलमान खानचा चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' हे एकाचवेळी प्रदर्शित होणार आहेत. दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर नाही तर 'आयसीसी टी-२०' वर्ल्ड कप दरम्यान आमने-सामने येणार आहेत. टी 20 वर्ल्ड कपमधील भारत पाकिस्तान सामन्याच्या दिवशी या दोन्ही चित्रपटांचा टीझर प्रदर्शित होणार आहे.

यशराज फिल्मच्या बॅनरखाली निर्मिती होत असलेल्या चित्रपटात शाहरुख खानसह दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहाम मुख्य भूमिका साकारणार आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट २५ जानेवारी, २०२३ ला हिंदी, तामिळ आणि तेलगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सलमान खान २०२२ च्या शेवटी बॉक्स ऑफिसवर कब्जा करणार आहे. त्याची 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) ३० डिसेंबर, २०२२ रोजी चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सलमानसोबत पहिल्यांदाच पूजा हेगडे दिसणार आहे. फरहाद सामजी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात व्यंकटेश दग्गुबाती, राम चरण, जस्सी गिल, शहनाज गिल, सिद्धार्थ निगम, पलक तिवारी, राघव जुयाल हे कलाकार दिसणार आहेत.

सलमान खान, कटरीना कैफ यांचा 'टाइगर 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख खान, नयनतारासोबत 'जवान' आणि तापसी पन्नूसह 'डंकी' या चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT