Salman Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Salman Khan: 'बिश्नोईला सांगू का?' सेटवर सलमान खानला धमकी; अज्ञात तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं प्रकरण काय?

Salman Khan Threat: बॉलिवूडच्या भाईजानला म्हणजे सलमान खानला पुन्हा बिष्णोई गँगकडून धमकी आली आहे. थेट अज्ञात तरुण शूटिंग सेटवर घुसला. नेमकं प्रकरण काय, जाणून घ्या.

Shreya Maskar

बॉलिवूडचा भाईजान सध्या बिश्नोई प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या जीवाला धोका आहे. त्याला आजवर अनेक धमक्या जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. आता पुन्हा एकदा सलमान खान धमकीचा शिकार झाला आहे.

अभिनेता सलमान खानला (Salman Khan) शूटिंग सेटवर आता धमकी मिळाली आहे. एक ज्ञान तरूणाने थेट शूटिंग सेटवर जाऊन भाईजानला धमकी दिली आहे. त्याने शूटिंग सेटवर बेकायदेशीरपणे प्रवेश केला. "मी बिश्नोईला सांगू का? असं तो तरुण म्हणाला. या तरुणावर संशय आल्यामुळे पोलिस त्याला शिवाजी पार्कच्या ठाण्यात चौकशीसाठी घेऊन गेले.

मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानला धमकी देणाऱ्या अज्ञान तरुणाने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेतले. ही घटना मुंबईमध्ये घडली. पोलिसांनी त्यांची कारवाई सुरू केली आहे. या घटने दरम्यान सलमान खान शूटिंगमध्ये व्यस्त होता. शोच्या लोकांना अज्ञान तरुणावर संशय आल्यावर त्यांनी पोलीसांना याची माहिती दिली.

याआधी देखील भाईजानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी देण्यात आली होती. तेव्हापासून सलमान खानला विशेष सुरक्षितता देण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर या सर्व प्रकरणाला सुरूवात झाली. अलीकडेच सलमान खानकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. तसेच त्याच्या घराबाहेर गोळीबार देखील झाला होता. हे प्रकरण दिवसेंदिवस वाढतच जात आहे. त्यामुळे सलमान खानच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

सलमान खान सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'सिकंदर' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तसेच तो 'बिग बॉस 18' या शोचे होस्टिंग देखील करत आहे. त्याच्या आगामी चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, रस्ता रोको आंदोलन करून अकोला जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? कोर्टात नेमकं काय झालं? वाचा A टू Z अपडेट

Diabetes and Modak: डायबिटीजचे रूग्ण मोदक खाऊ शकतात का? जाणून घ्या

SET Exam 2026: महत्वाची बातमी! सेटची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली, सप्टेंबरमध्ये 'या' दिवशी असेल पेपर

SCROLL FOR NEXT